Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

संस्कारक्षम अन् दोषमुक्त समाज निर्मितीसाठी सर्वांनी एकत्र येणं गरजेचं - पंकजाताई मुंडे

समाजातील  वाढती हुंडाप्रथा चिंतेची बाब

पंकजाताई मुंडेंच्या हस्ते नाशकात विविध क्षेत्रातील वंजारी युवकांचा थाटात सन्मान* 

आपला ई पेपर / 

नाशिक जो समाज एकेकाळी वंचित, पिडित होता, तो आज शिक्षणामुळे सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे, ही आपल्यासाठी भूषणावह बाब आहे. समाजाला आणखी पुढे नेण्यासाठी प्रत्येकांनी एकमेकांना मदतीची भावना अंगी बाळगण्याची आवश्यकता आहे. चांगल्या संस्काराबरोबरच दोषमुक्त समाज निर्मिती ही काळाची गरज आहे, त्यासाठी समाज धुरिणांनी एकत्रित  येऊन काम करावं असं आवाहन  भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज येथे केलं. समाजातील वाढत्या हुंडाप्रथेवर चिंता व्यक्त करत त्यांनी ही प्रथा बंद व्हावी यासाठी आता तरूणांनीच पुढं यावं असं म्हटलं आहे. 


  असोसिएशन ऑफ वी प्रोफेशनल यांच्या वतीने पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते आज  वंजारी युवा सन्मान सोहळा मोठया थाटात पार पडला त्यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. सुधाकर आव्हाड तर प्रमुख पाहूणे म्हणून आ. नरेंद्र दराडे, ॲड काकासाहेब घुगे, हेमंत धात्रक, गणेश गिते, उदय सांगळे, कोंडाजी आव्हाड, वैभव आव्हाड आदी मान्यवर उपस्थित होते.


   वी प्रोफेशनल ने आपले स्वतःचे एक वेगळेपण जपले आहे. वंजारी समाजातील स्वकर्तृत्वावर पुढे आलेल्या व्यक्तींचा हा ग्रुप आहे. समाजासाठी काहीतरी चांगलं करण्याचा उद्देश यामागे आहे, हे पाहून खूप आनंद झाला. मी राजकारणात असले तरी एक प्रोफेशनलच आहे. राजकारणात येण्यापूर्वी शेतकऱ्यांसाठी एका साॅफ्टवेअरची निर्मिती केली होती आणि त्याचं ओपनिंग प्रमोद महाजन आणि लोकनेते मुंडे साहेबांनी केलं होतं. आपला समाज आज प्रत्येक क्षेत्रात पुढे आहे. डाॅक्टर, वकील, अधिकारी तसेच उद्योजक म्हणूनही अनेक जण यशस्वी झाले आहेत. परदेशात संधी मिळूनही आपल्या मातीची ओढ असणारे इथे आहेत. त्यामुळेच याठिकाणी ते यशस्वी उद्योजक झाले, भरत गितेंच उदाहरण आज आपल्यापुढं आहे असं पंकजाताई म्हणाल्या.


दोषमुक्त समाजनिर्मितीची गरज

आपल्याला पुढे जायचे असेल तर चांगले संस्कार आणि चांगल्या गोष्टी जोपासल्या गेल्या पाहिजेत. आध्यात्मिक आणि चांगल्या कार्याची जोड दिली गेली पाहिजे.  संस्काराबरोबरच दोषमुक्त समाज निर्माण व्हावा. समाजात आज हुंड्याची प्रथा अतिशय फोफावत आहे, ती बंद करण्यासाठी तरूणांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे. सुंदर जगा, चांगले जगा, स्वार्थ बाजूला ठेवून एकमेकांना मदतीचा हात देताना एकीची वज्रमूठही बांधा असं आवाहन यावेळी पंकजाताईंनी केलं.


*यशस्वी युवकांचा सन्मान

या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या समाजातील युवकांना पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. ॲड अरविंद आव्हाड (वकील), भरत गिते (उद्योजक), श्रवणी सांगळे (क्रीडा), आश्लेषा सोळंके (विद्यार्थी), सत्यजित व अजित हंगे (कृषी), विलास बडे (मिडिया पर्सन), राहूल कराड (शैक्षणिक) आदींचा यावेळी गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचं प्रास्ताविक वी प्रोफेशनलचे अध्यक्ष उदय घुगे यांनी केलं. कार्यक्रमास समाजातील अनेक प्रतिष्ठित नागरिक, युवा वर्ग व महिला मोठया संख्येने उपस्थित होते.


*प्रकट मुलाखतीत दिली दिलखुलास उत्तरे 

-

युवा सन्न



सोहळ्यापूर्वी पंकजाताई मुंडे यांची पत्रकार विलास बडे यांनी प्रकट मुलाखत घेतली. लोकनेते मुंडे साहेबांचा वसा आणि वारसा, सध्याचं राजकारण, येणा-या अडचणी, संघर्ष, युवकांना आवाहन आदी विविध विषयांवर विचारलेल्या प्रश्नांना पंकजाताईंनी यावेळी दिलखुलास उत्तरे दिली.

••••

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या