काळभैरव यात्रोत्सवास उपस्थित रहा - मंगेश फड
आपला ई पेपर / परळी
परळी तालुक्यातील मांडवा येथे मार्गशिष पोर्णिमेला काळभैरवाची मोठी यात्रा भरते. या यात्रेला दरवर्षी मराठावाड्यासह आंध्र प्रदेश, तेलंगणा आदी. परराज्यातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात. आंध्रप्रदेशातील भाविक काळभैरवाला आपले कुलदैवत मानत असल्याने मोठ्या प्रमाणात हे भाविक यात्रोत्सवास आवर्जून उपस्थित राहतात.
प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षीही ग्रामस्थांच्या वतीने भव्य यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या बुधवार दि.७ रोजी सकाळी ८ ते १० श्री रामकथेची सांगता तद्नंतर भव्य यात्रोत्सव व पारंपरिक पालखी मिरवणूक आणि मंदिर प्रदक्षिणा होईल व दु. १ ते ३ वाजता ह.भ.प विठ्ठल महाराज उखळीकर यांच्या काल्याच्या किर्तनाने यात्रोत्सवाचा समारोप होईल
या कार्यक्रमासाठी विविध श्रेञातील मान्यवर व साधूसंतांची उपस्थिती लाभणार आहे. भाविकांनी भव्य यात्रोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे महाराष्ट्राचे युवक प्रदेशाध्यक्ष मंगेश फड यांनी केले आहे.



Social Plugin