Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

सिंदफणा पब्लिक स्कूलमध्ये सीबीएसई व्हॉलीबॉल क्लस्टर क्रीडा स्पर्धेच्या समारोप सोहळा संपन्न

 






सिंदफणा पब्लिक स्कूलमध्ये सीबीएसई व्हॉलीबॉल क्लस्टर क्रीडा स्पर्धेच्या समारोप सोहळा संपन्न

आपला ई पेपर / माजलगाव 

 केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सी.बी.एस. ई)  नवी दिल्ली द्वारे 19 वर्षाखालील मुले मुली 9 th क्लस्टर व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेचे आयोजन सिंदफणा पब्लिक स्कूल येथे करण्यात आले होते. या क्रीडा स्पर्धेचा समारोप सोहळा दिनांक.11 डिसेंबर 2022 रोजी सिंदफणा पब्लिक स्कूलच्या क्रीडांगणावर संपन्न झाला.


या कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन  करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या समारोप कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून माननीय आमदार प्रकाश दादा सोळंके अध्यक्ष मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सतीश बाप्पा सोळंके हे उपस्थित होते.सीबीएसई बोर्डाचे  समन्वयक  त्रिपाठी सर तसेच राष्ट्रीय व राज्य व्हॉलीबॉल पंच मंचावर उपस्थित होते. 

मंचावरील विशेष उपस्थितीमध्ये गणेश नाना सोळंके यांची उपस्थिती होती.

शाळेचे प्राचार्य अन्वर शेख सर यांनी आपल्या प्रास्ताविक पर भाषणात आलेल्या सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि पंच विजयी  खेळाडू यांचे अभिनंदन केले. सीबीएसई बोर्डाने प्रथमच आम्हाला या स्पर्धेची आयोजन  बद्दल संधी दिली या चार दिवस चाललेल्या स्पर्धेत अत्यंत उत्कृष्ट रित्या संपन्न झाल्या याचा निश्चित आनंद आहे यापुढेही अशाच प्रकारच्या  स्पर्धाचे आयोजन करण्याची संधी दिली तर पुढे ही जबादारीस पात्र राहू अशी शाश्ववती दिली.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश दादा सोळंके यांनी अध्यक्षीय  समारोप  करताना म्हणाले की केंद्रीय शिक्षण मंडळ,नवी दिल्ली आयोजित व्हॉलीबॉल क्लस्टर 9 च्या समारोप कार्यक्रमास उपस्थित राहून अंतिम सामने बघण्याचा योग आला याचा आनंद झाला. विजयी  खेळाडूंचे कौतुक करून त्यांना राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

यानंतर या स्पर्धेतील विजयी खेळाडूंसाठी बक्षीस वितरणाचा कार्यक्रमाचे आयोजन केले होते यामध्ये 19 वर्षे मुले या गटातून राम रतन विद्या मंदिर मुंबई या संघाने प्रथम क्रमांक पटकावला तर न्यू होरिझाईन कोल्हापूर यांनी द्वितीय क्रमांक पटकावला त्याचबरोबर सरहद स्कूल पुणे व आत्मा मलिक स्कूल कोकमठाण यांनी तृतीय क्रमांक पटकावला.


तसेच 19 वर्षे मुली या गटातून मिलेनियम नॅशनल स्कूल,पुणे. यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर न्यू होरिझन इंग्लिश स्कूल, कोल्हापूर.यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. त्याचबरोबर सिंदफणा  पब्लिक स्कूल, माजलगाव व आत्मा मलिक स्कूल कोकमठाण  यांनी तृतीय क्रमांक पटकावला.


वरील विजयी खेळाडू मधून अनुक्रमे प्रथम व द्वितीय मुले मुली यांचे संघ राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

यानंतर माननीय प्रकाश दादा सोळंके यांच्या हस्ते शाळेच्या ध्वजाचे व सीबीएससी बोर्डाच्या ध्वजाचे ध्वजाअवतरण करण्यात आले.


या क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्र व गोवा राज्यातून एकूण 26 संघ स्पर्धेत सहभागी झाले असून या मध्ये 16  मुलांचे संघ व 10 मुलींचे संघ सहभागी झालेले होते. यामध्ये मुलांच्या संघात 156 खेळाडू यांनी सहभाग घेतला तर मुलींच्या संघात 102 खेळाडूंनी सहभाग घेतला या खेळाडूंसोबत 34 संघ व्यवस्थापक सहभाग घेतला तर 12 राष्ट्रीय व राज्य पंच असे एकूण 304 लोकांचे जेवण व निवासाची व्यवस्था शाळेत करण्यात आलेली होती.


या कार्यक्रमाचे बक्षीस वितरणाचे सूत्रसंचालन जिजाराम गडाख, अर्चना जाधव आणि संध्या नोकवाल यांनी  तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य राहुल कदम सर यांनी केले तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिंदफणा पब्लिक स्कूलच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या