Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीजवळ गोळीबार | एकावर गुन्हा दाखल घटनेत जागेवरच कुञी ठार...

 


परळी तालुक्यात गोळीबार|एकावर गुन्हा दाखल घटनेत जागेवरच कुञी ठार...

आपला @पेपर / परळी 

परळीत गोळीबार ही घटना नवीन नाही.परंतु एका मुक्या जनावरावर गोळीबार ही घटना मात्र माणुसकीच्या दृष्टीने विचार करण्याजोगी आहे.


परळीत कुत्री भुंकल्याचा राग आल्याने एकाने तिला गोळ्या घालून निर्दयतेने ठार मारल्याची धक्कादायक घटना परळी तालुक्यातील धारावती तांडा शिवारात उघडकीस आली आहे. या प्रकरणी एकावर परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदण्यात आला.


विकास हरिभाऊ बनसोडे हे हॉटेल व्यावसायिक असून धारावती तांडा शिवारात त्यांचे हॉटेल आहे. हॉटेलच्या सुरक्षेसाठी त्यांनी एक कुत्राणी दोन कुत्र्या पाळलेल्या आहेत. या पैकी एक कुत्री शेजारच्या आखाड्यावर राहणाऱ्या रामराज कारभारी घोळवे यांच्यावर भुंकली होती. 


याचा राग आल्याने त्यानी शुक्रवारी दि११बनसोडे यांच्या हॉटेलवर येऊन त्या कुत्रीला बंदुकीच्या गोळ्या घालून ठार मारले. 


याबाबत हॉटेलच्या कर्मचाऱ्यांकडून माहिती मिळाल्यानंतर बनसोडे यांनी घोळवे यांना फोन करून जाब विचारला असता कुत्री मला भुंकली म्हणून तिला मारले असे उत्तर दिले. सदर फिर्यादीवरून रामराज घोळवे विरुद्ध परळी ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


*ब्रेकिंग न्यूज_माझा आपला@पेपर_Online All हेडलाईन्स न्यूज वाचण्यासाठी*

*अपघात अंबाजोगाईजवळ*

*भरधाव ट्रॅव्हल्सने मोटरसायकला उडवले एकाचा जागीच मृत्यू |*

*https://aplaepaper.blogspot.com/2022/11/blog-post_6.html

*हेडलाईन्स न्यूज...*

👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या