जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाचा सर्पदंशाने मृत्यू
आपला ई पेपर / Pune
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात ही हृदयद्रावक घटना घडली.मावळ तालुक्यातील बावधन येथील जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षिकेला साप चावल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या या शिक्षकाचा मृत्यूशी सुरू असलेला लढा अखेरचा ठरला...या शिक्षकाच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.
पद्मा केदारी असे मृत शिक्षिकेचे नाव आहे.पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील बावधन येथील जिल्हा परिषदेच्या पद्मा केदारी या शाळेत शिक्षिका होत्या. दुपारच्या सुमारास पद्मा जेवणाचा डबा खाण्यापूर्वी हात धुवायला गेल्या. मात्र त्याच दरम्यान त्यांनाला साप चावला.
जेवण करण्यापूर्वी हात धुण्यासाठी जात असताना पद्मा केदारी यांच्या हाताला विषारी साप चावून गेला.शिक्षिका पद्मा केदारी यांच्या दोन बोटांना विषारी सापाने लक्ष्य केले.सर्पदंशाची जखम लक्षात येताच शिक्षिकेला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पद्मा केदारी यांच्या शरीरावर विषबाधा झाली होती.खासगी रुग्णालयात डॉक्टरांनी पद्माचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र उपचारादरम्यान जे भीती वाटत होती तेच घडले.उपचार सुरू असतानाच शिक्षिका पद्मा केदारी यांचा मृत्यू झाला.शिक्षकाच्या मृत्यूमुळे परिसरात सध्या शोककळा पसरली आहे.


Social Plugin