Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळी वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास|१३३ कोटी बाबत बघा काय म्हणाल्या |पंकजाताई मुंडे

 


परळी वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास|
१३३ कोटी बाबत बघा काय म्हणाल्या |पंकजाताई मुंडे

@महाविकास आघाडीच्या काळात रखडला होता आराखडा 

@आता पुन्हा राज्य सरकार निधी उपलब्ध करून देणार


 भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी पालकमंत्री असताना मंजूर करून आणलेल्या १३३ कोटीच्या वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखडयास पुन्हा गती मिळणार आहे. हा विकास आराखडा जशाचा तशा राबविण्यासाठी पंकजाताई मुंडे यांचे शासन स्तरावर प्रयत्न सुरू असून लवकरच राज्य सरकारकडून यासाठी निधी उपलब्ध होणार आहे.


  पंकजाताई मुंडे बीडच्या पालकमंत्री असताना सुधीर मुनगंटीवार राज्याचे अर्थमंत्री होते.  


पंकजाताई मुंडे यांनी वैद्यनाथ ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या तीर्थक्षेत्र विकासाचा ध्यास घेतला होता, त्यांनी यासाठी सरकार दरबारी प्रयत्न करून वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकासासाठी १३३ कोटी ५८ लक्ष रुपयाचा विकास आराखडा मंजूर करून घेतला होता.  या आराखड्यातील कामांसाठी ३५ कोटी रुपयांचा निधी देखील पुरवणी मागणीव्दारे उपलब्ध झाला होता. 


या कामाचा शुभारंभ २९ ऑगस्ट २०१९ रोजी मुनगंटीवार व पंकजाताई यांच्या उपस्थितीत मंदिराच्या पायथ्याशी झाला होता. याच निधीतून २० कोटीच्या भक्त निवासाचे बांधकाम  सध्या  प्रगतीपथावर आहे. त्यानंतर निवडणूका झाल्या आणि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले, मागील पालकमंत्र्यांच्या दुर्लक्षामुळे निधी न मिळाल्याने हा आराखडा रखडला होता.


आराखडयास गती मिळणार

पंकजाताईंनी मंजूर करून आणलेला १३३ कोटीचा विकास आराखडा जशास तसा राबविण्यासाठी स्वतः पंकजाताई शासन दरबारी प्रयत्न करत आहेत. या विकास आराखडयाच्या माध्यमातून वैद्यनाथ मंदिर व परिसराचा मोठा विकास होणार असून पर्यटनाला चालना मिळणार आहे. 



मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना  भेटून त्यांनी यासंदर्भात आग्रही मागणी देखील केलेली आहे, या मागणीनुसार लवकरच यासाठी निधी उपलब्ध होणार असून आराखडयाच्या कामास गती येणार आहे.

••••

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या