Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

पुण्याच्या हत्याप्रकरणात | पतीनेच बेपत्ता झाल्याची दिली होती फिर्याद...




पुण्याच्या गुन्ह्यांमध्ये कुठलेही इव्हेंट्स नसताना परळी पोलिसांनी शोधला आरोपी... 

कौतुकास्पद कारवाई परळी डीबी टीमचे प्रमुख भास्कर केंद्रे व गोविंद भताने यांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या..



परळी पोलिसांच्या कारवाईने बीड पोलिसांची कारकीर्द पुण्यात वाढली नुकत्याच पुण्यातील एका गुन्ह्यांमध्ये कुठलेही इव्हेंट्स नसताना परळी पोलिसांनी धाडसाने कारवाई करत आरोपीला अटक केली.

सदरील घटना अशी की पुण्यातील गोरजाई नगर चाकण परिसरात एका ३० वर्षीय महिलेची तिच्या पतीने हत्या केल्याचा गुन्हा परळी शहर पोलिसांनी नोंदवला आहे.


याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, गोरखसचिन मुंडे, देवा मनवर व इसमास गोरख देशमुख नावाच्या रॉकी या इसमाने देशमुख वय 30, रा. गोरजाई नगर, चाकण पुणे यांना ठार मारण्यासाठी एक लाख रुपयांची सुपारी दिली. 


याप्रकरणी सदर महिलेच्या पतीने 5 सप्टेंबर रोजी चाकण पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली होती.


दरम्यान,या प्रकरणातील तिन्ही आरोपींनी सदर महिलेची हत्या करून मृतदेह चाकणच्या जंगलातील खड्ड्यात पुरला होता.


त्यानंतर पोलिसांचा संशय बळावू नये म्हणून त्यांनी मृतदेह खोदून डिझेल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. 

मात्र पावसामुळे मृतदेह अर्धवट जळाला होता, आरोपी दोन दिवसांनी पाहण्यासाठी गेला असता त्याला मृतदेह अर्धवट जळालेला दिसला, त्यामुळे त्याने मृतदेह दगडाला बांधून तलावात फेकून दिला. 

पोलिसांना कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय आरोपीचे फक्त आडनाव माहीत होते. संबंधित आडनावानुसार चाकण पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी परळी शहर पोलीस ठाण्याचे डीबी पथक प्रमुख भास्कर केंद्र यांच्याशी संपर्क साधला. 


भास्कर केंद्रे आणि गोविंद भताने यांनी सुनियोजित सापळा रचून गोपनीय माहिती काढत सुपारी किलर सचिन मुंडे याच्या मुसक्या आवळल्या विशेषत: आरोपीने मोबाईल सुद्धा वापरला नाही परळी डीपी टीमचे प्रमुख भास्कर केंद्रे आणि गोविंद भताने यांना आरोपीला पकडून पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात यश आले आहे.


*आपला@पेपर*
*हेडलाईन्स न्यूज*

👇
https://chat.whatsapp.com/HY3ddB1QsDx9xtbJEs39Um

*join WhatsApp group:*
*https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr*

हेडलाईन्स न्यूज वाचण्यासाठी
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या