Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

समाजसेवा |डेंग्यु सदृष्य डासांचा नायनाटासाठी स्वःखर्चातून केली फवारणी

 







समाजसेवा|डेंग्यु सदृष्य डासांचा नायनाटासाठी स्वःखर्चातून शाळा परिसरात केली फवारणी


माजलगाव येथील सामाजिक कार्यकर्ते नितीन सोपानराव जुजगर यांनी औरंगाबाद येथील अल्फोन्सा इंग्लीश स्कुल परिसरात  स्वःखर्चातून औषध फवारणी केली आहे. शाळेतील विद्यार्थ्यांचा डेंग्यु सदृष्य डासापासून बचाव व्हावा, त्यांचे व शाळेतील शिक्षकांचे आरोग्य अबाधित रहावे या उद्देशाने त्यांनी औषध फवारणी केली. 


दरम्यान या आरोग्य उपक्रमाचे अल्फोन्सा इंग्लीश स्कुलने सन्मानपत्र देवून गौरव केला आहे.

माजलगाव येथील रहिवाशी व औरंगाबादेत नोकरीनिमित्त स्थायीक असलेले नितीन सोपानराव जुजगर यांनी औरंगाबाद येथील अल्फोन्सा इंग्लीश स्कुल, बजाजनगर येथे स्वयं प्रेरीत होवून स्वतःच्या खर्चाने डेंग्यू सदृष्य डासांचा नायनाट व्हावा या दृष्टीकोनातून औषध फवारणी केली आहे.


त्यांच्या याउपक्रमामुळे शाळेतील विद्याथी व शिक्षकांचे आरोग्य अबाधित राहण्यासोबतच आरोग्यदायी वातावरण निर्माण होण्यास मदत होणार आहे. त्यांच्या या निस्वार्थ सेवेबद्दल अल्फोन्सा शाळेचे व्यवस्थापक, मुख्याध्यापिका व सर्व शिक्षकांनी कौतूक केले आहे. 


समाजासाठी समाजातील एक व्यक्ती पुढे येतो हे महत्वाचे असून आपल्या उपक्रमाचे मनापासून स्वागत आणि आभार एका सन्मानपत्राद्वारे करण्यात आले आहे. दरम्यान यापूर्वीही नितीन जुजगर यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत.