Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत | ढाल-तलवार चिन्हाचे | ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

 


ढाल-तलवार चिन्हाचे परळीत ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

परळीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेनेस मिळालेले ढाल-तलवार चिन्ह तालुक्यातील घराघरात पोंहचवुन शिवसेनेची ताकद वाढवणार असल्याचे बा.शिवसेनेचे ता.प्र.शिवाजी शिंदे व धनंजय गित्ते यांनी सांगितले आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षास मिळालेल्या ढाल- तलवार या चिन्हाचे बुधवारी परळीत फटाक्यांच्या अतिषबाजी करत ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले.निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबाची शिवसेना पक्षास ढाल तलवार चिन्ह दिल्यानंतर परळी शहरात राणी लक्ष्मीबाई टॉवर येथे आज बुधवार दि.12 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वा.तालुकाप्रमुख शिवाजी शिंदे व धनंजय गित्ते यांच्या नेतृत्वाखाली ढाल-तलवारीचे चिन्ह घेऊन फटाक्यांची अतिषबाजी करण्यात आली.


ढोल- ताशांच्या गजरात  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आगे बढो हम आपके साथ है,जय भवानी जय शिवराय च्या घोषणा देण्यात आल्या.


यावेळी बोलताना शिवाजी शिंदे व धनंजय गित्ते यांनी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करतांना चे प्रतीक ढाल तलवार असून महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विचार,ढाल तलवारीच्या माध्यमातून घराघरात पोहचिविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची भावना व्यक्त केली आली.


यावेळी उपजिल्हा प्रमुख ॲड. रामराव माने,महिला ता.प्रमुख यशोदा राठोड,ता. सचिव विश्वनाथ राठोड,उपतालुका प्रमुख सुंदर रावळे,विष्णू ढेबरे उपशहर प्रमुख सिरसाळा, ॲड.संजय डीघोळे, सचिन स्वामी बालासाहेब देशमुख, वैजनाथ माने,युवा सेना शहर प्रमुख गजानन कोकीळ,संजय कदम,नवनाथ सरवदे,गजानन कदम,सचिन बुंदुले,रमेश लोखंडे, विठ्ठल गायकवाड,महेश जुनाळ,सुरेश बिडगर,कृष्णा सरवदे,गजानन राठोड,अंकुश राठोड आदी असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या