Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

आत्मरक्षा स्वंरक्षण प्रशिक्षण शिबिर हे आपल्या आयुष्यात महत्त्वपूर्ण | डॉ.जगदीश कावरे

 


आत्मरक्षा स्वंरक्षण
प्रशिक्षण शिबिर हे आपल्या आयुष्यात महत्त्वपूर्ण | डॉ.जगदीश कावरे

परळी येथे महर्षी दयानंद व्यायाम शाळा आयोजित महिला आत्मरक्षा संरक्षण शिबिर व बाल संस्कार वर्गाचे प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत उद्घाटन संपन्न दि १८ ऑक्टोबर २०२२ ते ३ नोव्हेंबर  २०२२ या कालावधीमध्ये, ८ वर्षे ते २९ वर्षे वयोगटातील मुला मुलींचे आत्मरक्षा व्यायाम शिबिर तथा संस्कार वर्ग सुरू करण्यात आले आहेत.


या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर जुगल किशोर लोहिया, देविदास कावरे सर  प्रशांत कुमार शास्त्री,जयपाल  लाहोटी, सुभाष नाणेकर सर,गोवर्धन चाटे सर,शिवशंकर कराड सर,अतुल दुबे सर आदी मान्यवर उपस्थित होते.


उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला यावेळी जुगलकिशोर लोहिया यांनी आपल्या भाषणामधून मुलांना आरोग्याचे धडे दिले व आत्मरक्षा शिबिराचे महत्व सांगून सांगितले


बुद्धीच्या विकासाप्रमाणेच शारीरिक दृष्टिकोनातून आपले शरीर कशा पद्धतीने मजबूत करता येईल केले जाईल हे या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थी विद्यार्थिनींना व आलेल्या पालकांना देखील  सांगताना आत्मरक्षा स्वरक्षण प्रशिक्षण शिबिर हे आपल्या आयुष्यात किती महत्त्वपूर्ण आहे असे डॉ.जगदीश कावरे यांनी  व्यक्त केले.


  याव्यायाम शिबिरामध्ये मुलींचा प्रवेश संख्या वाढावी यामुळे स्वतंत्र महिला तसेच मुली यांच्यासाठी विशेष तज्ञ प्रशिक्षक म्हणून सौ.गोदावरीताई कावरे मॅडम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

  महिला प्रशिक्षक नियुक्त करण्यात आलेले आहेत. 

या कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी महर्षी दयानंद व्यायामशाळेचे विद्यार्थी राहुल तिडके, अजय राऊत, विक्रम स्वामी ,तेजस देशमुख,तेजस जाधव,तेजस केंद्रे, कृष्णा लोखंडे, आलियान, आली, अरिहंत गायकवाड तसेच आर्य समाज परळी आदीनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या