Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत महाराष्ट्र बँकेला लागली आग ऐन दिवाळीच्या तोंडावर परिसरातील लोकांची उडाली धांदल

 










परळीत महाराष्ट्र बँकेला लागली आग ऐन दिवाळीच्या तोंडावर परिसरातील लोकांची उडाली धांदल


परळी शहरातील मोंढा भागात असलेल्या महाराष्ट्र बँकेला भिषण आग लागल्याची घटना आज सकाळी साडेनऊच्या वाजण्याच्या सुमारास घडलीआहे.

नगरपालिका अग्निशामक दलाचे नवजवान व परिसर पोलीस प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी वेळीच धाव घेतल्यामुळे सदरील आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. दिवाळीत बँकेला सुट्टी असल्यामुळे अनेक दुर्दैवी घटना घडल्या नाहीत. कारण या बँकेत सतत गर्दी असते त्यामुळे अशा घटना घडल्यावर गर्दीमध्ये दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता असते त्यामुळे सुदैवाने तशी कुठलेही घटना घडली नाही.


परळीच्या गजबजलेल्या मध्यवर्ती भागात असणारी मोंढा भागातील  महाराष्ट्र बँकच्या दुसऱ्या मजल्यावर अचानक आगीचे व धुराचे लोळ येत असल्यामुळे परिसराने नागरिकांनी वेळीच सतर्क राहून अग्निशामक दलाला कळवल्यामुळे ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. आगडोंब उठल्याने धुराचे लोळ सर्वत्र पसरले आहेत.

बँक ऑफ महाराष्ट्रात आज दिनांक शनिवार रोजी अचानक लागलेले आगे मध्ये बँकेचे लाखो नोबिता लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे समजते आगीची ही घटना कशामुळे घडली याबाबत अद्यापही बँकेने कुठलाही दुधाला दिलेला नाही सदरील घटनेत पोलिसांचा तपास पंचनामा सुरू आहे 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या