Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

Beed Parli | आरोग्य विभाग आयुक्तांच्या दौऱ्याने वैद्यकीय कर्मचाऱ्यांची झोप उडाली

 


बीड व परळी तालुक्यात आरोग्य विभाग आयुक्तांच्या दौऱ्याने वैद्यकीय कर्मचाऱ्यांची झोप उडाली

बीड आरोग्य विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचा नुकताच बीड दौरा जाहीर झाल्याने ऐन दिवाळीत आरोग्य विभागातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांची झोप उडाली आहे. 


 शिस्तप्रिय अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आरोग्य विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारताच डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी मुख्यालयात राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच राज्यभरात एकाच वेळी रात्रीच्या वेळी अचानक तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.राज्याचे आरोग्य आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज बीड जिल्हा रुग्णालयाला अचानक भेट दिली. यावेळी रुग्णालयातील मुलभूत सुविधा व सेवांच्या बाबतीत अधिकारी व कर्मचाऱ्यांची चांगलीच काळजी घेण्यात आली.


 उपसंचालक लातूर यांना 31 ऑक्टोबरपर्यंत अहवाल पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अमोल गीते यांनाही सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.


बीडमध्येही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चर्‍हाटा, नालवंडी येथे पाहणी केली. डॉक्टर गैरहजर होते. त्यानंतर आयुक्तांनी सर्व अधिकाऱ्यांची ऑनलाइन बैठक घेऊन रुग्णसेवा सुधारण्याबाबत सूचना केल्या... आता तुकाराम मुंढे स्वत: या दिवाळीत बीड दौऱ्यावर आले होते . 


या दौऱ्यात आरोग्य संस्थांना भेट देऊन आढावा घेतला आहे.  त्यामुळे कर्मचारी व आरोग्य संस्था चिंतेत आहेत. दरम्यान, दिवाळीचाच गोंधळ सुरू असतानाच आयुक्तांच्या दौऱ्याने वैद्यकीय कर्मचाऱ्यांची झोप उडाली आहे.


*आजच्या ब्रेकिंग न्यूज_माझा आपला@पेपर_online*

https://youtu.be/dM3yoAayfVg

join my WhatsApp group: *https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr*

👇👇👇👇👇

*all हेडलाईन्स न्यूज वाचण्यासाठी*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*


*आजच्या ब्रेकिंग न्यूज_माझा आपला@पेपर_online*

https://youtu.be/dM3yoAayfVg

join my WhatsApp group: *https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr*

👇👇👇👇👇

*all हेडलाईन्स न्यूज वाचण्यासाठी*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या