Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

कौतुकास्पद | परळीत पाठीवर थाप माणुसकीची स्वागत कर्तृत्वाचे...|



 कौतुकास्पद | परळीत पाठीवर थाप माणुसकीची स्वागत कर्तृत्वाचे...|


परळी वैजनाथ येथील  गोपालकृष्ण चित्र मंदिर समोरील अंबेवेस रस्त्याला नाल्यामुळे चार चाकी गाड्या खड्यामध्ये पडत आहेत. यावेळी तेथे उपस्थित असलेले हॉटेल चालक वैजनाथ मिसाळ व न.प. स्वच्छता विभाग कर्मचारी अविनाश मस्के व इतर सहकाऱ्यांनी खड्यात पडलेली चार चाकी वाहन तब्बल दोन तास झाले तरी निघत नव्हते तेव्हा मदत म्हणून ते वाहन त्या खड्ड्यातून बाहेर काढले याच कर्तुत्वाचा सत्कार म्हणून त्यांचा गुणगौरव करण्यात आला हाच कर्तुत्वाचा सत्कार म्हणजेच जोपासलेली माणुसकी आहे,



सध्या समाजामध्ये कुठलीही घटना घडली की गर्दीही कायम असते परंतु ही गर्दी बघ्याची असून मदतीला कोणीही धावत नाही. अशाच एक प्रकार परळी शहरात गोपाल कृष्ण येथील रस्त्यावर घडला होता 


या रस्त्याला असलेल्या खड्ड्यात एक चार चाकी वाहन अडकून पूर्ण वाहतूक जाम झाले होते ही घटना येणाऱ्या जाणाऱ्यांनी... मोबाईल मध्ये कैद केली परंतु माणुसकीचा आधार म्हणून कोणीही मदतीला गेले नव्हते...तेव्हा ज्यांनी मदत केली त्यांच्या कर्तुत्वाचा सत्कार दैनिक मराठवाडा साथी येथे करण्यात आला.



त्यांच्या या कर्तृत्वाचा सत्कार करीत असतांना संपादक सतिश बियाणी, ओमप्रकाश बुरांडे व उपस्थित पत्रकार भगवान साकसमुद्रे, संतोष बारटक्के, विश्वजीत कांबळे होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या