Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवन कार्यावर उद्या परळीत चित्रप्रदर्शनी

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवन कार्यावर उद्या परळीत चित्रप्रदर्शनी



पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते उदघाटन ; प्रदर्शनाचा सर्व जनतेनी लाभ घेण्याचं भाजपचं आवाहन


परळी येथे भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त "सेवा पंधरवाडा" उपक्रमातंर्गत त्यांच्या जीवन कार्यावर आधारित चित्रप्रदर्शन भाजपच्या वतीनं उद्या भरविण्यात येणार आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उदघाटन होणार आहे.


 उद्या गुरुवार २९ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अक्षता मंगल कार्यालय येथे हे चित्र प्रदर्शन भरविण्यात येत आहे. पंतप्रधान मोदी यांचा एकूण जीवन प्रवास, त्यांनी सर्व सामान्य जनतेच्या हितासाठी घेतलेले निर्णय आणि त्यांच्या नेतृत्वाखाली होत असलेली देशाची प्रगती याचा लेखाजोखा यात मांडला जाणार आहे. सर्व जनतेसाठी हे प्रदर्शन खुले असणार आहे.



परळी शहर व ग्रामीण भागातील भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच बुथ प्रमुख, पेज प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख, सर्व संस्थांचे लोकप्रतिनिधी, विविध आघाड्यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन भाजपच्या वतीने करण्यात आले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या