Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

पुन्हा मराठा आरक्षणाबाबतचा प्रश्न लांबणीवर जाणार सरकारचे वेळ काढू धोरण...




पुन्हा मराठा आरक्षणाबाबतचा प्रश्न लांबणीवर जाणार सरकारचे वेळ काढू धोरण...


चंद्रकातदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणाबाबत मंत्रिमंडळ उपसमिती

मुंबई येथे मराठा आरक्षणाबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांच्या अध्यक्षतेखाली 6 जणांची मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे.


अशाच प्रकारची समिती शिक्षण विभागात सेवक भरती व सेवकांचा आकृतीबंध आजही फाईल बंद आहे याच संदर्भात समिती स्थापन केली होती आज तिला पंधरा वर्षे होत आहेत अजून त्यांचा अहवाल नाही किंवा त्यावर कुठलीही कारवाई नाही त्यामुळे हाच जिवंत अनुभव पुढे सांगतो आहे की मराठा आरक्षणाच्या संदर्भातही अशा समित्या अनेक निर्माण होणार...


 या समितीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, बंदरे मंत्री दादा भुसे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत यांचा समावेश आहे. 

ही समिती राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थिती तसेच इतर संलग्न बाबींबाबत अहवालातील शिफारशींवर वैधानिक कार्यवाही करेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या