Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

पुण्यात या फॅशन शोमध्ये प्रमुख अतिथी म्हणून प्रशांत जोशी यांच्या हस्ते बक्षीस वितरण...

 



पुण्यात या फॅशन शोमध्ये प्रमुख अतिथी म्हणून प्रशांत जोशी यांच्या हस्ते बक्षीस वितरण... 


हिमानी अग्रवाल मिसेस हेरिटेज इंडिया तर डॉक्टर सपना साहू बनल्या क्लासिक हेरिटेज इंडिया 2022

पुण्यातील मृणाल एंटरटेनमेंटच्या ऐतिहासिक  वारसा जपण्याच्या खास कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

अभिनेत्री श्रुती मराठे, मराठी दिग्दर्शक अभिजित पानसे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण संपन्न

महिला स्पर्धकांनी देशाच्या विविध भागांतील सांस्कृतिक वारसा आपल्या वेशभूषातुन साकारला


पुणे येथे देशाच्या विविध भागातील सांस्कृतिक ऐतिहासिक वारसा जोपासण्यासाठी अनोखा फॅशन शो मृणाल एंटरटेनमेंट प्रस्तुत 'मिस अँड मिसेस हेरिटेज इंडिया - 2022' या स्पर्धेमध्ये हिमानी अग्रवाल या मिसेस हेरिटेज इंडिया पदाच्या मानकरी ठरल्या तर डॉ. सपना साहू यांनी मिसेस क्लासिक हेरिटेज इंडिया हा किताब पटकावला. 


पुण्यात पिंपरी येथील नटसम्राट निळूभाऊ फुले नाट्यगृहात मृणाल एंटरटेनमेंट यांच्या वतीने या अनोख्या फॅशन शो चे आयोजन करण्यात आले होते. मृणाल एंटरटेनमेंटच्या मृणाल गायकवाड यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.


भारताचा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी मिसेस आणि क्लासिक हेरिटेज इंडिया या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पुण्यात नुकत्याच झालेल्या या फॅशन शोमध्ये मिसेस हेरिटेज इंडिया हिमानी अग्रवाल यांच्यासह फर्स्ट रनर अप सोनिया बनगर, सेकंड रनर अप हर्षदा धनगर तसेच क्लासिक हेरिटेज विजेत्या डॉक्टर सपना साहू यांच्यासह फर्स्ट रनर अप अलका निकम, सेकंड रनर अप माधुरी दगमाळे या ठरल्या. तसेच मिसेस सिटी इंडिया इंडियाचा किताब गौरी ठाकूर, श्रेया वर्मा व हर्षा बनसोडे यांना अनुक्रमे मिळाला.


या अनोख्या फॅशन शो मध्ये महिला स्पर्धकांनी आपल्या वेष भूषा मधून देशातील 26 सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा स्थळांचे देखावे साकारले होते. यामध्ये जगन्नाथ पुरी, मांढेरा मंदिर, राणीचा बाग, गीर अभयारण्य, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, गेट वे ऑफ इंडिया, किल्ले प्रतापगड, सुवर्ण मंदिर, होळकर वाडा, कोणार्क मंदिर, हंपी येथील सांची स्तूप, इत्यादी देखावे स्पर्धक महिलांनी आपल्या वेष भूषेतून साकारत उपस्थितांची दाद मिळवली, हे स्पर्धेचे आगळे वेगळे वैशिष्ट्य होते.


या स्पर्धेसाठी अभिनेत्री श्रुती मराठे, मराठी चित्रपट दिग्दर्शक अभिजित पानसे यांच्यासह संकल्प ग्रुपचे डॉक्टर पांडुरंग कदम, चित्रपट महामंडळाचे मेघराज राजे भोसले, अंकिता पाटील ठाकरे, जय महाराष्ट्र मसालेचे अजित गायकवाड, सुनिता मोडक, अजित कुलकर्णी, सचिन नागर, प्रशांत जोशी, सुधीर निंबाळकर यांची विशेष उपस्थिती होती.


स्पर्धेचे परीक्षक म्हणून कविता शहा अवस्थी, अभिनेत्री प्रियंका पवार, विशाल कपूर, बॉलीवूड डिझायनर दुर्गा बिस्वाल, सी जी बॅनर्जी यांनी काम पाहिले. तसेच मागील वर्षीच्या विजेता गौरी थोरात व अक्षदा शिंदे यावर्षी मलेशियात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत असे आयोजक मृणाल सुमित गायकवाड यांनी यावेळी सांगितले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या