Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळी साक्षात माँ वैष्णोदेवी मंदीरातील ज्योत संपुर्ण उत्सवात ज्योत अखंडपणे तेवत राहणार....


माँ वैष्णोदेवी मंदीरातील ज्योत संपुर्ण उत्सवाच्या कालावधीत ही ज्योत अखंडपणे तेवत राहणार 

जय माता दी.. जय माता दी...परळीतून वैष्णोदेवीची दिव्य ज्योत आणण्यासाठी भाविकांचे प्रस्थान

नाथ प्रतिष्ठान, राधा-मोहन साथी प्रतिष्ठानचा नवरात्र उपक्रम

परळी नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने नाथ प्रतिष्ठान व राधा-मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने माजी मंत्री आ. धनंजय मुंडे, न.प. गटनेते वाल्मीकअण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली राधा-मोहन साथी प्रतिष्ठानचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांच्या विशेष प्रयत्नातून  माँ वैष्णो देवी दर्शन देखावा सादर करण्यात येत असून या पार्श्वभूमीवर जम्मू-कश्मिर मधील माँ वैष्णोदेवी मंदीरात प्रज्वलीत झालेली दिव्य ज्योत परळी येथे आणली जाणार असून संपुर्ण उत्सवाच्या कालावधीत ही ज्योत अखंडपणे तेवत राहणार आहे. विशेष वाहनाद्वारे संयोजन समितीचे चार सदस्य आज सायंकाळी जम्मू-कश्मिरसाठी रवाना झाले असून 


परळी येथील श्री वैद्यनाथ मंदीराची शाल देवीजींच्या चरणी अर्पण केली जाणार असून तेथून वैष्णोदेवीची चुनरी आणली जाणार आहे. नाथ प्रतिष्ठान, राधा-मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने नाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष आ. धनंजय मुंडे, ज्येष्ठ नेते वाल्मिकअण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली राधा-मोहन साथी प्रतिष्ठानचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांच्या विशेष संयोजनाखाली नवरात्र उत्सव-2022 साजरा केला जाणार असून औद्योगीक वसाहत येथे दुमजली वैष्णोदेवी दर्शन देखावा हुबेहुब पद्धतीने साकारला जात आहे. 


या देखाव्यात वैष्णोदेवीचे चरण दर्शन, आसपासचे विविध मंदीरे तसेच मुख्य मुर्ती, भुयारी मार्ग साकारला जात आहे. या देखाव्याचे एकुण अंतर 700 फुट एवढे असून डोंगर-दऱ्या आदींचे स्वरुप तेथे साकारले जाणार आहे.

या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर परळी शहर व परिसरातील भाविकांना वैष्णोदेवी दर्शनाचा साक्षात अनुभव व्हावा, असा संयोजकाचा प्रयत्न असून त्याची अनुभूती अधिक चांगल्या पद्धतीने यावी या दृष्टीकोनातून कटरा-जम्मू कश्मिर येथे वैष्णोदेवी मंदीरात असलेली ज्योत दुसऱ्या ज्योतीला प्रज्वलीत करुन अखंड दिव्य-ज्योत परळीत आणली जाणार आहे. दिव्य ज्योत आणण्यासाठी परळी येथून विशेष वाहन तयार करण्यात आले असून 


यामध्ये मराठवाडा साथीचे संपादक सतिश बियाणी, राजेश मोदाणी, प्रकाश वर्मा, संजय शर्मा, बालासाहेब काळे यांनी आज वैष्णोदेवीकडे प्रस्थान केले आहे. माजी नगराध्यक्षा राधाबाई बियाणी, मुख्य संपादक चंदुलाल बियाणी, सौ. कल्पना बियाणी, राजस्थानी मल्टीस्टेटचे सचिव बद्रीनारायण बाहेती, चंद्रप्रकाश काबरा, जयप्रकाश बियाणी, राधेशाम झंवर, आनंद हडबे यांनी वाहनाचे पूजन करीत प्रवासाला निघालेल्या सर्वांचे पुष्पहार घालून स्वागत केले. यावेळी विविध स्तरातील मान्यवर नागरिक तसेच दुर्गोत्सव टीमचे सर्व सदस्य उपस्थित होते. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या