Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

श्रीवक्रेश्वर महाराज पुण्यतिथी सोहळा,परमरहस्य पारायण उत्साहात संपन्न परळी येथे श्री वक्रेश्वर महाराज

 



श्रीवक्रेश्वर महाराज पुण्यतिथी सोहळा,परमरहस्य पारायण उत्साहात संपन्न

परळी येथे श्री वक्रेश्वर महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा आज परळी येथे विविध धार्मीक कार्यक्रमांसह संपन्न झाला. यानिमित्ताने आरती व महाप्रसाद असे कार्यक्रम पार पडले. यानिमित्त श्रीमन्मथस्वामी यांचे परमरहस्य पारायण पार पडले. अनेक महिलांनी तीन दिवसीय पारायणात सहभाग घेतला होता.

श्रीवक्रेश्वर देवता यांचा पुण्यतिथी महोत्सव श्री वक्रेश्वर महाराज मंदिर कमिटीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. आज शनिवार दि.10 सप्टेंबर रोजी आरती व महाप्रसादाने महोत्सवाची सांगता झाली. श्री वक्रेश्वर देवताला नागेश सोमनाथअप्पा हालगे यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. सलग तीन दिवस परमरहस्य पारायणाचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला. 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विश्वस्त कमिटी सदस्य सोमनाथअप्पा हालगे, विजयकुमार मेनकुदळे, रत्नेश्वरअप्पा कोरे, दत्ताप्पा इटके गुरूजी, चंद्रकांतअप्पा समशेट्टे, विठ्ठलअप्पा चौधरी, नारायण खके, विश्वनाथअप्पा हरंगुळे, सुभाषअप्पा भिंगोरे आदींसह पदाधिकारी व सदस्यांनी प्रयत्न केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या