Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

प्रभु वैद्यनाथावरील स्तुतिगानचे शिवकथाकार प.पु.प्रदिपजी मिश्रा महाराजांच्या हस्ते लोकार्प

 


प्रभु वैद्यनाथावरील स्तुतिगानचे  शिवकथाकार प.पु.प्रदिपजी मिश्रा महाराजांच्या हस्ते लोकार्पण

वैद्यनाथावरील या भक्तीगानमध्ये प्रभु वैद्यनाथाचे स्थान महत्वपुर्ण असून वैद्यनाथ क्षेत्रातील इतर तिर्थक्षेत्रांच्या ओविबध्द रचना आहेत.सदरील भक्तीगित भक्तीमय आवाज संगिताच्या चालीमध्ये ध्वनीमुद्रीत करण्यात आले आहे


परळी बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभु वैद्यनाथाचे वेगळे अधिष्ठान असुन नगरसेवक गोपाळ आंधळे यांनी रचित करुन ध्वनीबध्द केलेले प्रभु वैद्यनाथावरील स्तुतीगानचे आंतरराष्ट्रीय शिवकथाकार प.पु.प्रदिपजी मिश्रा महाराजांच्या हस्ते वैद्यनाथाच्या पावन भुमित रविवारी लोकार्पण करण्यात आले.

  

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभु वैद्यनाथानाची महंती विषद करणारे भक्तीगानाची नगरसेवक गोपाळ आंधळे यांनी रचना करुन ध्वनीबध्द केले.या भक्तीगान चे लोकार्पण तिसऱ्या  श्रावण सोमवारच्या पुर्वसंध्येला प्रभु वैद्यनाथाच्या सानिध्यात वैद्यनाथ देवल कमेटीच्या कार्यालयात रविवार दि.14 ऑगस्ट रोजी सायंकाळी 8 वाजता लॅपटॉप वरुन करण्यात आले.


यावेळी उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे,नायब तहसिलदार बाबुराव रुपनर,वैद्यनाथ देवल कमेटीचे विश्वस्त राजेश देशमुख यांच्या,मारवाडी युवा मंचचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी,शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अभयकुमार ठक्कर,देवल कमेटीचे विश्वस्त प्रा.बाबासर देशमुख,बाबुराव मेनकुदळे,अनिल तांदळे,नागोराव देशमुख,रघुविर देशमुख,नंदकिशोर जाजु,न्यायाधिश मुंडे,नगरसेवक राजेंद्र सोनी,ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे,प्रा.रविंद्र जोशी,संपादक राजेश साबणे,धनंजय आढाव,संभाजी मुंडे,दत्तात्रय काळे,महादेव गित्ते,स्वानंद पाटिल,अनंत कुलकर्णी,हनुमान आगरकर,मुकुंद आंधळे आदींची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या