Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

दु:खद बातमी |भाजपच्या नेत्या चिरंजीव गणेश फड यांचे निधन



दु:खद बातमी |भाजपच्या नेत्या श्रीमती सुशिलाताई फड यांचे चिरंजीव गणेश फड यांचे निधन ;आज अंत्यसंस्कार

 परळी शहरातील माणिक नगर व शास्त्रीनगर भागातील रहिवाशी गणेश जळबा फड यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले आहे. मृत्यूसमयी ते 40 वर्षे वयाचे होते. गणेश फड यांच्या आकस्मिक निधनाने मित्र परिवारामध्ये सर्व स्तरातून शोक व्यक्त होत आहे.

आज अंत्यसंस्कार...

परळी येथील मुक्तीधाम मध्ये आज दि.31 रोजी दुपारी 4 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांची अंत्ययात्रा शास्त्रीनगर येथील त्यांचे राहते येथून निघणार आहे

भाजपाच्या नेत्या सुशीला ताई फड यांचे गणेश फड हे ज्येष्ठ चिरंजीव होते आज आंबेजोगाई येथे उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली आहे.

 त्यांच्या पश्चात आई ,पत्नी,एक चार बहिणी, भावजई असा मोठा परिवार आहे. गणेश जळबा फड हे परळी शहरात सर्व परिचित व्यक्तिमत्व होते. विविध धार्मिक,सामाजिक, सांस्कृतिक कार्यात ते नेहमी सक्रिय होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या