Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

शुन्यातुन विश्व निर्माण करणाऱ्या दोघांचा थाटात सेवापुर्ती गौरव समारंभ

शुन्यातुन विश्व निर्माण करणाऱ्या दोघांचा परळीत थाटात सेवापुर्ती गौरव समारंभ....


रेल्वे प्रशासनात कार्य करणारे शेख गफार यांचे कार्य मनाला भावणारे होते |परळी रेल्वे मुख्य व्यवस्थापक जितेंद्र मिना



ज्ञानोबा घटे यांचे सेवाकार्य कौतुकास्पद |संपादक सतीश बियाणी व प्राचार्य लोखंडे



परळी येथे नोकरी करीत असतांना केवळ प्रामाणिकपणा महत्वाचा नसतो तर आहे त्या कामात जीव ओतून मनापासून काम करणे महत्वाचे असते.ज्ञानोबा घटे यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत तर शेख गफार शेख आब्दुला यांनी परळी रेल्वे कर्मचारी म्हणून नोकरी केली या दोघांनी नौकरी म्हणून नाही तर सेवा म्हणून अत्यंत मनापासून काम केले आहे. त्यांचे हे कार्य कौतुकास्पद असल्याचे

दोन्ही वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात सर्वांनीच त्यांचे कौतुक करून गुणगौरव समारंभात पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले 


तर एका कार्यक्रमात बोलताना औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य लोखंडे यांनी ज्ञानोबा घाटे यांचे कौतुक केले.


आयुष्याच्या संघर्षात अनेक समस्यांना तोंड देत यांनीशुन्यातुन विश्व निर्माण केले आहे.मुलांचे शिक्षण आणि परिवार आनंद ठेवणे एवढेच उद्दिष्ट ठेवून या दोघांनी सेवा करताना समाधान मानले


नुकतीच 38 वर्षे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सेवा करून आज सेवापुर्ती गौरव समारंभ परळी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये पार पडला. प्रारंभी ज्ञानोबा घटे व सौ. मिरा घटे यांचा शाल, श्रीफळ देवून गौरव करण्यात आला. 


या कार्यक्रमामध्ये दै.मराठवाडा साथीचे संपादक सतीश बियाणी, ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे, काबरे सर, विलासराव ताटे, बालासाहेब पोरे, मोटाळे सर, कृष्णाली घटे, रागीणी घटे, चक्रधर घटे, खलील सर, सौ. स्वातीताई ताटे, आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले. 


कार्यर्क्रमाचे सुत्रसंचालन कुकडे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन चक्रधन घटे यांनी केले. या कार्यक्रमाला बहुसंख्येने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे कर्मचारी वृंद व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या