Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

खिजर खान यांचा उत्कृष्ट सहभाग व उत्कृष्ट पर्यवेक्षकचा सम्मान

खिजर खान यास D.EL.ED विद्यालय अनुभव कार्यक्रमांतर्गत 

उत्कृष्ट सहभाग व उत्कृष्ट पर्यवेक्षकचा सम्मान 





परळी मदरसा-तुल-फलाह एज्युकेशन अंड वेफअर सोसायटी अंबाजोगाई संचालित मदरसा दारुल यतामा उर्दू डि-एल-एड विद्यालय येथे डी-एल-एड च्या शेवटच्या वर्षाचा विद्यार्थ्यांसाठी विद्यालय अनुभव सप्ताहाच्या आयोजन श्रीसोमेश्वर विद्यालय धायगुडा पिंपळा येथे दि. 18 जुलै ते 23 जुलै ‌पर्यंत करण्यात आला होते.या विद्यालय अनुभव सप्ताह मध्ये डी-एल-एडच्या शेवटच्या वर्षाचे विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.



मदरसा दारुल यतामा उर्दू डी-एल-एड विद्यालय येथील विद्यार्थी खिजर खान जाकेर खान यास उत्कृष्ट सहभाग व उत्कृष्ट पर्यवेक्षक चा सम्मान प्राप्त झाला या निमित्ताने सर्वस्तरातुन त्याचे अभिनंदन होत आहे.



सन्मान समारंभाच्या कार्यक्रमामध्ये मौलाना रमजान ईशाची सेक्रेटरी मदरसा दारुल येतामा डी-एल-एड उर्दू कॉलेज‌, मुस्ताक पटेल सर, खाजा पटेल माजी सरपंच पिंपळा, वसंत गोरे सरपंच पिंपळा,अमीर पटेल उपसरपंच, मोबीन पटेल, सफीर पटेल,फारूक पटेल, गणी पटेल प्राध्यापक नबी सर, आणि प्राध्यापक आलिया बाजी व शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी वर्ग उपस्थित होता

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या