भर दिवसा एका तरुणाचा खून आरोपीस अटक
बीडमध्ये भरदिवसा एका तरुणाची हत्या करण्यात आली, क्षुल्लक वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळत आहे.
बीड शहरातील खांडेश्वरी परिसरात मंगळवारी दुपारी एका तरुणाला काही तरुणांनी बेदम मारहाण केली. या बेदम महाराणीमध्ये बेदम मारहाणीमुळे तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या तरुणाची हत्या करण्यात आल्याची माहिती परिसरात चर्चेतून स्पष्ट होत आहे.
या तरुणाची हत्या केल्यानंतर मारेकरी घटनास्थळी गर्दीत उभा होता. खून झालेल्या तरुणाची रात्री उशिरापर्यंत ओळख पटलेली नव्हती. दारू पिण्याच्या वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून, ताब्यात घेतलेला आरोपी घटनास्थळी उभा होता.
Social Plugin