Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

तरुणाचा मृतदेह |शौचालयाच्या गेटला लटकलेल्या अवस्थेत आढळला |

तरुणाचा मृतदेह | शौचालयाच्या लोखंडी गेटला | लटकलेल्या अवस्थेत आढळला..|






लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील अहमदपूर शहरात एका 19 वर्षीय तरुणाचा मृतदेह शौचालयाच्या लोखंडी गेटला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे.अहमदपूर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. रामचंद्र उर्फ ​​निशांत नारायण कोनाळे असे मृत मुलाचे नाव आहे.



  पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, अहमदपूर शहरातील नंदवन कॉलनी येथे राहणारा रामचंद्र उर्फ ​​निशांत नारायण कोनाळे रा. ठोट सावरगाव, जि. अहमदपूर 19 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मित्राला भेटायला जातो म्हणून घराबाहेर पडला होता.  



 महात्मा गांधी महाविद्यालय परिसरातील शौचालयाच्या लोखंडी  गेटला गळफास घेतलेल्या अवस्थेत   सापडल्याची माहिती मुलाच्या काकांनी पोलिसांना दिली  असे फिर्यादीत म्हटले आहे. हत्या की आत्महत्या याबाबत परिसरात चर्चा सुरु असून पोलीस याचा अधिक तपास करीत आहे. आत्महत्या केल्याची माहिती आधारे  पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या