हा समाज | या दैनंदिन दिनदर्शिकेची होळी करणार | कारण तो उल्लेख चुकीचा आहे |
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी 26 रोजी मंगळवारी "श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा" वाशिम हिंगोली खामगाव अकोला मराठवाडा परळी बीड नांदेड आदी ठिकाणी समाज बांधव मोठ्या भक्तिभावाने साजरा करतात. हा समाधी सोहळा संपूर्ण महाराष्ट्रात तसेच देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्याच दिवशी श्री संत नामदेव महाराजांनी आपल्या कुटुंबीयांसह पंढरपुरात श्रीविठ्ठलाचे दर्शन घेतले, मंदिराच्या प्रवेशद्वारावर जिवंत समाधी घेण्यात आली.
संतांची जयंती तितकीच महत्त्वाची आहे. ज्या दिवशी संजीवन समाधी घेतली जाते तो दिवसही तितकाच महत्त्वाचा आहे. म्हणून हा समाधी सोहळा साजरा केला जातो. परंतु अनेक कॅलेंडरमध्ये संत नामदेवांची पुण्यतिथी असा उल्लेख आहे.तो उल्लेख चुकीचा आहे. कारण मृत्यू झालेल्या लोकांची पुण्यतिथी साजरी केली जाते. श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांनी जिवंतपणे समाधी घेतली आहे. त्यामुळे संजीवन समाधी
सोहळ्याचा उल्लेख योग्य आहे. आणि तसे केले पाहिजे अन्यथा संपूर्ण शिंपी समाजाच्या वतीने हे या दैनंदिन दिनदर्शिका संपूर्ण पणेहोळी करुन निषेध करण्यात येईल समाजाच्या वतीने असा इशाराही निवेदनाद्वारे दिला आहे.
काही ठिकाणच्या शिंपी समाज निमंत्रण पत्रिकेतील "पुण्यतिथी महोत्सव" व "पुण्यतिथी सोहळा" हे चुकीचे शब्द दुरुस्त करावेत. पुण्यतिथी म्हणजे निधनाचा दिवस, तो उत्सवाचा दिवस कसा असेल. "संजीवन समाधी सोहळा" असा शब्दप्रयोग बदलण्याची जाहीर विनंती शिंपी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
Follow this link to
join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/HY3ddB1QsDx9xtbJEs39Um
SBI | HDFC | ICICI | बँकेचे ग्राहक असाल तर | ही बातमी तुमच्यासाठी..| https://bit.ly/3PA3vKK
Social Plugin