Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

अंबाजोगाईजवळ अपघात|भरधाव कारने | दोघांना उडवले |

 अंबाजोगाईजवळ अपघात|भरधाव कारने | दोघांना उडवले |





अंबाजोगाईहून केजकडे येणारा राजस्थानचा ट्रक (RJ-11/G B-1086) चंदन सावरगाव बस स्थानकाजवळ रस्त्याच्या कडेला थांबला होता. 



  प्रवासाला सुरूवात करण्यापूर्वी ट्रक चालक आणि क्लिनर ताहेर हुसेन आणि इस्माईल यांनी खाली उतरून टायरमधील हवा तपासत असताना. त्याचवेळी अचानक अंबाजोगाई कडून केजकडे जाणाऱ्या भरधाव वेगातील कारने   ताहेर हुसेन व इस्माईल याना उडवले ट्रक चालक व क्लिनर हे दोघे जागीच ठार झाले. 



 कार रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पलटी झाली. कारमधील प्रदीप अर्जुन मुंडे व रवी दिलीप मुंडे. जि. धारूर हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच जखमींना १०८ रुग्णवाहिकेतून रुग्णवाहिका चालक मकरंद घुले यांनी तात्काळ उपजिल्हा रुग्णालय केज येथे आणले. 



   युसूफवडगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक एस. संदीप दहिफळे यांच्या सूचनेवरून पोलिस उपनिरीक्षक औटी, पोलिस नाईक बाळासाहेब घोरपडे, कदम, चालक शहेनशहा यांनी घटनास्थळी पोहोचले 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या