Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

आलेल्या संधीचे सोने करायचे | सेवानिवृत्ती विषयी | दोन शब्द |


मी शिवकुमार निर्मळे,मुख्याध्यापक

श्री योगेश्वरी नूतन विद्यालय

 अंबाजोगाई तीस जून रोजी सेवानिवृती झालो.

१०४ वर्षाची परंपरा असलेल्या योगेश्वरी विद्यालयात ३२ वर्षे सेवा करण्याची संधी मला मिळली, हे मी माझे भाग्य समजतो. एनसीसी विभागात चीफ ऑफिसर पर्यंत बढती घेतली. अनेक छात्र व खेळाडू मैदानावर घडविले जवळपास पाचशे जण पोलिस आणि सैन्यदलात कार्यरत आहेत शिस्त व निर्व्यसनी हजारों युवक घडविल्याचेही समाधान लाभले

आयुष्यभर प्रामाणिक पणे खेळाडू घडविण्याचे काम केले.

अनेक खेळाडू तालुका, जिल्हास्तर, विभागीय , राज्यस्तर आणि राष्ट्रीय स्तरावर चमकले.

माजी विद्यार्थी व आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू अक्षय राऊत याला शिवछत्रपती अॅवॉर्डने सन्मानीत करण्यात आले.

राष्ट्रीय पातळीवरीय शालेय क्रिकेट स्पर्धेच्या महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र क्रिकेट स्पर्धेत आमचा खेळाडू निशांत जोशीला " मॅन ऑफ दि मॅच " पुरस्कार मिळला. अजित जाधवने चमकदार कामगिरी केली.

प्रजासत्ताकदिनी दिल्ली येथे आयोजित एनसीसीआरडी परेडसाठी ओंकार रापतवार याने यशस्वी कामगिरी केली.

तीसवर्षे सकाळ बालकुमार चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले. पंचेवीस वर्ष गणेश मंडळाचे परीक्षण केले.

पंधरा वर्षे लोकन्यायालयात पंच म्हणून कार्य केले. सामाजिक समस्या सोडविण्यासाठी ३३ वर्ष सकारात्मक पत्रकारिता केली राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा मध्ये पंच म्हणून कार्य केले. सामुहिक सूर्यनमस्कार व सामुहिक योगासनाचे मोठ्या मैदानावर अनेक वेळा आयोजन केले . राज्यस्तरीय योगेसन स्पर्धेत सहभागी झालो. एनसीसीच्या राष्ट्रीय प्रशिक्षणात रनिंग स्पर्धेत द्वितीय पारितोषिक पटकावले

शाळा सुटल्यानंतर विविध खेळासाठी खेळाडूंचा सराव करून घेतला. तालुकास्तरीय खोखो स्पर्धेत अनेक वेळा अजिंक्यपद पटकावले. क्रिकेट , फूटबॉल व बॅडमिंटन मध्ये जिल्हयात प्रथम पारितोषिक मिळविले. बीड जिल्हा क्रीडा शिक्षक संघटनेचे पाचवर्ष यशस्वी अध्यक्षपद सांभाळले दरवर्षी

राष्ट्रीय क्रीडा दिनी " आदर्श खेळाडू पुरस्काराचे " वितरण केले

हैद्राबाद मुक्ती संग्रामा निमित्त आयोजित ध्वजारोहन कार्यक्रमात जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी गोविंदभाई श्रॉफ यांच्या हस्ते झेंडावंदन करून त्यांच्या सोबत रॅलीत सहभाग घेतला जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक अॅड. आर. डी. देशपांडे व प्राचार्य एकनाथराव कुलकर्णी यांच्या मार्गदर्शना खाली स्वातंत्र्य सैनिकांचा विभागीय मेळावा घेण्यात आला. नरहर कुरुंदकर साहित्य समारोहात

दीर्घ कार्य केले. माजी विद्यार्थी संघटना ( योगेश्वरी शिक्षण संस्था ) याचे सचिव म्हणून काम पाहिले.

नवीन वर्षात शाळेतील मुलांकडून शेकडो वह्या व पेन गोळा केले आणि गरीब होतकरू मुलांना त्याचे वाटपही केले.शाळेच्या भितींवर सुविचार टाकले.

मरगळ दूर करण्यासाठी " क्रीडा महोत्सवा " च्या माध्यामातून विद्यार्थ्यांसाठी विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. दर्पण दिनाचे औचित्य साधून शहरातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. रोटरी क्लब मध्ये बावीस वर्ष सामाजिक कार्य केले.

प्रज्ञाशोध परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा व एसएससी बोर्ड परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.


प्रवेशोत्सव कार्यक्रम आणि मोफत पाठयपुस्तक वाटप कार्यक्रम उत्साहात घेण्यात आला. त्यासाठी शाळेतील सहकार्यांनी मोलाचे सहकार्य केले.

निवृत्तीच्या अगोदर एकहजार दिवसांपूर्वी मी एक निश्चय केला. प्रत्येक दिवसाचे चोवीस तास आनंदाने घालवायचे. आलेल्या संधीचे सोने करायचे ठरविले

आयुष्याचा महत्वाचा टप्पा सेवानिवृत्तीचा असतो

सेवा निवृत्ती नंतर पत्रकारिता आणि साहित्य निर्मिती करण्याचा मानस आहे. आपल्या सर्वांच्या भेटी वारंवार होतील. सामाजिक क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रात भरभराटीसाठी आपले नेहमीच प्रयत्न राहतील.

-

शिवकुमार निर्मळे, मुख्याध्यापक,

श्री योगेश्वरी नूतन विद्यालय , अंबाजोगाई.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या