Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

BEED | अपघात | बायपासला उभ्या ट्रकवर | कंटेनर आदळला | एक ठार

 BEED | उभ्या ट्रकवर कंटेनर आदळला अपघातात | एक ठार




बीड जिल्ह्यातील गेवराई येथे बायपास रोडवर थांबलेल्या कंटेनरला झालेल्या अपघातात चालकाचा मृत्यू झाला आहे. शेख हमीद बनमिया वय ३५, कोळेवडगाव उपजिल्हा, पैठण जि. औरंगाबाद असे चालकाचे नाव आहे




गेवराई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जालन्याहून सोलापूरकडे सळई घेऊन जाणारा ट्रक MH 14 BG 0852 मंगळवारी रात्री दोनच्या सुमारास गेवराई बायपासवर बंद पडला होता.




 त्यावेळी या मार्गाने एक कंटेनर MH 20 DE 4433 औरंगाबादहून बीडकडे जात होता. अंदाज न आल्याने कंटेनर ट्रकवर मागून धडकला त्यात चालक शेख हमीद बनमिया हा गंभीर जखमी झाले.त्यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी गेवराई पोलिसात घटनेची नोंद झाली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या