Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

PARLI BEED |100 कोटी रु निधी |रेल्वे उड्डाणपुलाच्या चौपदरीकरण होणार

 धनंजय मुंडेंच्या मागणीला मोठे यश | 

श्यामा प्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपुलाच्या चौपदरीकरणासाठी नितीन गडकरींनी दिली मंजूरी















दुसऱ्या उड्डाणपुलासह | दोन्ही उड्डाणपूल 4 स्तरांचे असतील | लवकरच निविदा काढणार 

धनंजय मुंडे | मला समृद्धीसाठी काम करण्याची ताकद द्या |

https://bit.ly/3IH9NpA



बीड जिल्ह्याच्या हद्दीतील अंबाजोगाई लातूर रोडवरील रस्ताही चौपदरी करण्यात येणार आहे, केंद्राने मागवला प्रस्ताव  परळी माजी मंत्री धनंजय मुंडे    केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दि.16 जून रोजी दिल्लीत झालेल्या बैठकीतील मागणीला मोठे यश मिळाले, परळी शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या श्यामा प्रसाद मुखर्जी रेल्वेच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक विभागाने 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. 



उड्डाणपूल आणि थर्मल परिसरात असलेला दुसरा उड्डाणपूल. निधीसाठी मंजूर केलेल्या कामांमध्ये R.M.548 B वरील श्यामा प्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपुलाचे चौपदरीकरण आणि R.M.361 वरील रेल्वे उड्डाणपुलासह परळी शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक ते थर्मल पॉवर प्लांट प्रवेशद्वारा पर्यंतच्या रस्त्याचे चौपदरीकरण या दोन कामांचा समावेश असेल या आर्थिक वर्षात यासाठी 100 कोटी मंजूर करण्यात आले आहेत. 



या दोन्ही कामांची निविदा प्रक्रिया लवकरच राबविण्यात येणार आहे. धनंजय मुंडे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे समस्त परळीवासीयांच्या वतीने आभार मानले आहेत. माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी 16 जून रोजी दिल्लीत नितीन गडकरी यांची भेट घेऊन यासंदर्भात मागणी केली होती. परळी शहरातील दोन्ही रेल्वे उड्डाणपूल वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असून अनेक वर्षांपासून हा उड्डाणपूल विस्ताराच्या प्रतीक्षेत होता. 



    धनंजय मुंडे यांचे आणखी एक निवडणूकतील आश्वासन उड्डाणपुलाच्या चौपदरीकरणाने पूर्ण होणार आहे. दरम्यान, वाघाळा पूल ते लातूर जिल्ह्याच्या हद्दीतील अंबाजोगाई ते लातूर या 14 किलोमीटरच्या रस्त्याच्या चौपदरीकरणाची मागणीही मान्य करण्यात आली असून, केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाने यासंदर्भात 100 कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश विभागाला दिले आहेत.आमदार धनंजय मुंडे यांचे सर्वांना विशेष करून विनम्र आवाहन  काय आहे ते वाचा

https://bit.ly/3v7GWp9



   नितीन गडकरी यांच्या भेटीत धनंजय मुंडे यांनी या पुलाचे वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्व अधोरेखित केले.तसेच अंबाजोगाई लातूर रस्त्याच्या रुंदीकरणासह बीड जिल्ह्यातील इतर काही राष्ट्रीय महामार्ग व पुलांचे विस्तारीकरण व दुरुस्ती करण्याची मागणी केली. त्या इतर मागण्यांनाही या आर्थिक वर्षात टप्प्याटप्प्याने निधी दिला जाईल. @@

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या