Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

संजय दौंड यांची विधान परिषद सदस्यपदी बिनविरोध निवड...

संजय दौंड यांची  विधान परिषद सदस्यपदी बिनविरोध  निवड...
मुंबई// विधानपरिषद निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार ( राष्ट्रवादी काँग्रेस ) संजय दौंड यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे. धनंजय मुंडे विधानसभेवर निवडून आल्याने रिक्त झालेल्या जागी संजय दौंड यांची बिनविरोध निवड झाली आहे. भाजपा उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने त्यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे 
दरम्यान भाजपचे उमेदवार राजन तेली यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. या निवडणुकीसाठी विधानसभेचे आमदार करणार मतदान करणार होते. मात्र संख्याबळ नसल्याने भाजपाने माघार घेतली आहे.
संजय दौंड हे माजी मंत्री पंडितराव दौंड यांचे पुत्र आहेत. पंडितराव दौंड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. श्री शरदचंद्र पवार यांचे जुने संबंध असून संजय दौंड यांनी अनेक वर्षे बीड जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम केलं आहे.

श्री.शरद पवार व धनंजय मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांना शब्द दिला होता व तो शब्द राष्ट्रवादीच्या कोट्यातील जागा देऊन पूर्ण केला.

दरम्यान राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झालेल्या संजय दौंड यांच्या रूपाने बीड जिल्ह्यात आणखी एक आमदारकी आली असून जिल्ह्याच्या विकासासाठी आपण मिळुन काम करू असे म्हणत आनंद व्यक्त केला आहे.

परळी तालुक्याला आणखी एक आमदार मिळाला याचा विशेष आनंद असल्याचे सांगत मुंडे यांनी पवार साहेब व महाविकास आघाडीच्या नेत्यांचे आभार मानले आहेत.