Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीतून सुटणारी अकोला पॅसेंजर आता,उद्यापासून परळी ऐवजी परभणी येथून सुटेल..कश्यामुळे तर वाचा बातमी


 दक्षिण मध्य रेल्वेचा परभणी ते परळी सेक्शनमध्ये ७७ दिवसांचा लाईन ब्लॉक 


परळी // परभणी ते परळी सेक्शन मधील गंगाखेड ते पोखर्णी नरसिम्हा रेल्वे स्थानक दरम्यान रेल्वे पटरीच्या दुरुस्ती करीता सकाळी ०९:४५ ते दुपारी १३:४५ दरम्यान रोज चार तासांचा लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक दिनांक ६ जानेवारी ते २२ मार्च २०२० दरम्यान ७७ दिवसांचा असेल. या मुळे  पुढील गाड्यांवर परिणाम होईल.

१.गाडी संख्या ५७५५४ आदिलाबाद ते परळी सवारी गाडी परभणी पर्यंतच धावेल. म्हणजेच हि गाडी परभणी ते परळी दरम्यान दिनांक ६ जानेवारी ते २२ मार्च दरम्यान अंशतः रद्द असेल. 

२. गाडी संख्या ५७५४० परळी ते अकोला सवारी गाडी दिनांक ६ जानेवारी ते २२ मार्च दरम्यान परळी ते परभणी दरम्यान  अंशतः रद्द असेल. हि गाडी या तारखेस परभणी ते अकोला अशी धावेल, परळी ऐवजी परभणी येथून सुटेल. 

प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयी बद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे हि विनंती.जनसंपर्क कार्यालय,नांदेड यांनी केले आहे .