Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

तब्बल ४१ वर्षांनंतर राजकारणाची डवपेच; काकाला अंधारात ठेवून भाजपाला पाठिंबा...! कसे घडले वाचा संपूर्ण बातमी ...




मुंबई // तब्बल ४१ वर्षांनंतर केला असून काकाला अंधारात ठेवून भाजपाला पाठिंबा दिला असून स्वत: उपमुख्यमंत्री पद मिळविले आहे. योगायोग म्हणजे शरद पवार यांनी तो प्रयोग केला, त्याला यशवंतराव चव्हाण यांचा पाठिंबा नव्हता. तसेच आता अजित पवार यांनी जे केले त्याला शरद पवार यांचा पाठिंबा नाही. तेव्हापासून गेली ४१ वर्षे खंजीराचे हे राजकारण शरद पवार यांची पाठ सोडत नव्हती. आता शरद पवार यांचा प्रयोग त्यांचा पुतण्या अजित पवार यांनी त्यांच्यावर उलटविला आहे.
वसंतदादा पाटील यांच्या सरकारमध्ये १९७८ मध्ये सहभागी असताना शरद पवार यांनी रात्रीत काँग्रेसमध्ये फुट पाडून पुरोगामी लोकशाही दलाची स्थापना करुन जनता पक्षाशी आघाडी केली होती. शरद पवार हे मुख्यमंत्री झाले होते, त्यावेळी त्यांचे गुरु आणि काँग्रेसचे महाराष्ट्राचे नेते यशवंतराव चव्हाण यांना अंधारात ठेवले होते. त्यावेळी शरद पवार यांच्यावर पाठीत खंजीर खुपसला अशी प्रतिक्रिया दिली गेली होती.

हा प्रयोग पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी 

अजित पवार हे गेल्या अनेक दिवसांपासून नाराज होते. शरद पवार यांनी ईडीच्या कार्यालयात जाण्याचा निर्णय घेतला होता. त्या दिवशी संपूर्ण राज्यभर शरद पवार यांच्या या खेळीची चर्चा होती. त्याच सायंकाळी अजित पवार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन शरद पवार यांनी दिवसभर जो माईलेज मिळविले होते. त्यावर मात करीत अजित पवार यांच्याकडे सर्व झोत गेला होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी चर्चा सुरु असताना अजित पवार हे एकदा बैठकीतून उठून गेले होते. तेव्हा त्यांनी बारामतीला जात असल्याचे सांगितले होते. त्यावरुनही गोंधळ उडाला होता.
शिवसेनेला बहुमत सिद्ध करता आले नाही म्हणून राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेसला संधी दिली होती. त्यासाठी त्यांनी दुसऱ्या दिवशीची रात्री आठ पर्यंतची वेळ दिली होती. असे असतानाही अजित पवार यांनी सकाळी साडेअकरा वाजता राज्यपालांना फोन घेऊन आम्ही बहुमत आता सिद्ध करु शकत नाही. तुम्ही वेळ द्या असे सांगितले होते. त्यावरुन राज्यपालांनी निष्कर्ष काढला की राष्ट्रवादी काँग्रेस सरकार स्थापन करु शकत नाही.

आणि केंद्राला राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा अहवाल दिला. त्यानंतर राष्ट्रपतीनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली होती़ खरं तर त्याचवेळी अजित पवार हे भाजपाशी संधान बांधून असल्याचे समजले होते. पण, त्याकडे शिवसेना आणि काँग्रेसने तसेच राष्ट्रवादी काँग्रेसने दुर्लक्ष केले. ते आता या सर्वांनाच महाग पडले आहे. शरद पवार यांना त्यांच्या पुतण्यानेच त्यांची ४१ वर्षापूर्वीची खेळी त्यांच्यावर उलटवली आहे.