परळीत उड्डाणपुलावर खून
उड्डाणपुलावर धारदार शस्त्रांनी केलेल्या हल्ल्यात तो जागीच मृत्यू
परळीकर अवैध धंद्याने वैतागलेले
असताना आज सकाळी ११.३०
वाजण्याच्या सुमारास सिध्दार्थनगर येथे
राहणारा धिरज सुधाकर चव्हाण (वय
४० वर्षे) याची हिंदनगर या परिसरात
पोटात चाकू भोसकून अतिशय निघृणपणे
खून केला आहे. सदरील आरोपींनी
मयत धीरज चव्हाणला मारल्यानंतर या
ठिकाणाहून फरार झाले.अवैध धंद्या बाबत
बीडच्या विविध पथकाच्या माध्यमातून
कारवाई होते. मात्र स्थानिक पोलिस
कारवाई करत नाहीत. त्यामुळे स्थानिक
पोलिसांच्या कारभाराबद्दल प्रश्न निर्माण
होत आहेत. सदरील
पोलिसांना या गंभीर बाबीची माहिती
मिळाल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनाला
पाठविल्यानंतर दुपारपर्यंत गुन्हा दाखल
करण्याची प्रक्रिया सुरू होती. सदरील
हा खून जुन्या भांडणाच्या कारणावरून
झाला की आणखी कशावरून तपासणीत समोर येईल .

Social Plugin