Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

सत्ता स्थापनेसाठी भाजपाचा प्लॅन 'बी' तयार;शरद पवार होऊ शकतात ? राष्ट्रपती ..!



मुंबई //भाजपने शिवसेनेशी पुन्हा जवळीक साधण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. याबाबत भाजपने प्लॅन सुद्धा तयार केला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीय.सत्ता स्थापनेबाबतचा पेच राज्यात कायम असताना शिवसेनेची काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी वाढत चाललेली जवळीकभाजपसाठी अडचण बनत चालली आहे. 

भाजपच्या एका नेत्याने दिलेल्या माहितीनुसार भाजपा शिवसेनेशी संवाद साधण्याचा प्रयत्न जरी करत असली तरी, भाजप आपल्या मुख्यमंत्रीपदावर ठाम आहे आणि ते भाजपकडे राहणार. जर भाजपने शिवसेनेसोबत मुख्यमंत्रीपदाबाबत तडजोड केली तर एनडीएतील इतर घटक पक्षांना देखील चुकीचा संदेश जाईल आणि ते देखील उपद्रव करतील या कारणामुळे भाजप आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे या नेत्याने सांगितले.

तसेच जर शिवसेनेचे काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी सूत जुळले नाही तर भाजप सोबत शिवसेना येऊ शकते. अशा वेळेस शिवसेनेचा पूर्ण मान ठेवला जाईल अशी माहिती या भाजप नेत्याने दिली आहे. तसेच यावेळी भाजप सोबत येण्यासाठी शिवसेना हिंदुत्वाचे कारण देऊ शकते असे देखील या भाजप नेत्याने सांगितले.

तसेच भाजपने सत्ता स्थापनेसाठी प्लॅन बी देखील तयार ठेवला आहे. यामध्ये भाजप राष्ट्रवादीचा बाहेरून पाठींबा मिळवेल आणि विश्वासदर्शक ठरावावेळी राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार अनुपस्थित राहतील. गेल्या विधानसभेप्रमाणे राष्ट्रवादीने जशी भूमिका घेतली होती तशीच भूमिका यावेळी घ्यावी लागेल. तरीदेखी भाजपला आणखी पंधरा जागांची जुळवा जुळव करावी लागेल, केंद्रात त्यांचे सरकार असल्यामुळे ते करणे त्यांना सहज शक्य आहे. मात्र या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका महत्वाची ठरणार आहे.जर शरद पवार यांनी भाजपाच्या  सत्ता स्थापनेसाठी प्लॅन बी तयार झाले तर 2022 शरद पवार होऊ शकतात ? राष्ट्रपती ..!