एक /दोन दिवसांतच बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देण्याची न्यायालयाच्या शक्यता...आहे !
मुंबई // सध्याच्या सरकार बनविण्याच्या प्रक्रियेबाबत कर्नाटकाप्रमाणेच महाराष्ट्रातील सर्वोच्च न्यायालय निकाल देऊ शकते . न्यायालयाने असा आदेश दिला तर २४ तासांत देवेंद्र फडणवीस सरकारला बहुमत सिद्ध करण्याची कसरत करावी लागेल.
एक – दोन दिवसांतच बहुमत सिद्ध करण्याचे आदेश न्यायालयाचा निर्णय येउ शकतो अशी शक्यता आहे. सध्या भाजपकडे १०५ आमदार आहेत. अपक्षांचा पाठिंबा मिळून ही संख्या १२५ पर्यंत वाढली आहे. तरीही आणखी २० आमदारांची भाजपला गरज आहे. अजितदादांच्या पाठिंब्यामुळे भाजपला हे २० आमदार फोडता येतील अशी अपेक्षा होती. परंतु अजितदादांसोबत सध्या तीन ते चारच आमदार आहेत. त्यांच्यावरही पक्षांतर बंदीची कारवाई होऊ शकते. हे तीन ते चार आमदार मतदान प्रक्रियेत गैरहजर राहिले किंवा तटस्थ राहिले तरीही भाजपला बहुमताचा आकडा गाठता येणार नाही. भाजपला काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या तिन्ही पक्षांतून किमान २० ते २५ आमदार फोडणे गरजेचे आहे. तरच विधानसभेत बहुमत सिद्ध शक्य होईल.
आमदार फोडाफोडीत' हे' यशस्वी होतील का ?
अजितदादांच्या नंतर शरद पवारांनी काल एकाच दिवसांत जोरदार सूत्रे हलवली. अजितदादांबरोबर गेलेल्या सगळ्या आमदारांना शरद पवार, सुप्रिया सुळे व इतर नेत्यांनी स्वतः संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे जवळपास ८ आमदार परत आले आहेत. अजितदादांबरोबर अवघे ४ ते ५ आमदार उरले असल्याचे सध्या चित्र आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीसह काँग्रेस व शिवसेनेनेही आपले सगळे आमदार विविध हॉटेलांमध्ये सुरक्षित ठिकाणी ठेवले आहेत. भाजप नेत्यांचा आपल्या आमदारांपर्यंत संपर्कही होणार नाही, याची काळजी हे तिन्ही पक्ष घेत आहेत. त्यामुळे आमदार फोडण्यात भाजप कितपत यशस्वी होऊ शकेल याविषयी शंका उपस्थित केली जात आहे.


Social Plugin