मुंबई //राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास सत्ता पर्यायानं भाजपच्याच हातात राहणार आहे व नंतर भाजपला त्यांचा अजेंडा राबवता येणार आहे. जम्मू-काश्मीर हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. मेहबुबा मुफ्ती यांच्याशी पटत नसल्यानं भाजपनं त्यांचं सरकार काढून तिथं राष्ट्रपती राजवट लागू केली आणि पुढं या राज्याचं विभाजन करून तेथील ३७० कलम रद्द करून टाकलं. हा अनुभव असल्यानं आता नेमकी कोणती भूमिका महाराष्ट्रात घेणार व हे राजकीय वादविवाद संपविणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .172 अन्वये राज्यपालांना वेळीची मर्यादा नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सरकार स्थापन करण्याचा दावा नाकारला तर राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे. राष्ट्रपती राजवटीत राज्यपाल हे केंद्र सरकारच्या वतीने कारभार पाहतात. हा विभाग केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत येतो. त्यामुळे राष्टपती राजवटीत राज्याचे कारभारी अमित शहा बनू शकतात.भाजपने सत्तास्थापनेसाठी असमर्थता दर्शवल्यानंतर सेनेला वेळेत दावा दाखल करता आलेला नाही.शिवसेनेला राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचा पाठिंबा वेळेत न मिळाल्यानं सत्ता स्थापनेचा दावा दाखल करण्यासाठी उशिर झाला. राज्यात एका पक्षाला थेट बहुमत नसल्यामुळे सत्ता समीकरणे जुळत नाहियेत आणि सरकार स्थापन करताना सर्वच पक्षाना अडचणी निर्माण होत आहेत.
आज रात्री आठ वाजेपर्यंतचा वेळ हा राष्ट्रवादीला राज्यपालांनी दिला आहे.
दरम्यान,आता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी राज्यपालांनी शिफारस करत अहवाल पाठवला असल्याची माहिती राजकीय सूत्रांनी दिली आहे,त्यानंतर तिसरा पक्ष म्हणून राज्यपालांकडून राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण देण्यात आलेले आहे..तसेच केंद्रीय मंत्रीमंडळाची याबाबत एक बेठक सुरू असून महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.


Social Plugin