Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

बिग ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्रातल्या राजकारणातील आतापर्यंतची सर्वात महत्वाची बातमी संजय राऊत लीलावती रुग्णालयात दाखल

बिग ब्रेकिंग न्यूज 

मुंबई // राऊत यांनी लिलावतीमधील डॉक्टरांची वेळ घेतली होती. आगामी 2 दिवस संजय राऊत हे लिलावती रूग्णालयात उपचार घेणार आहेत. गेल्या दोन आठवडयापासुन राऊतांची प्रंचड धावपळ झाली होती. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली असून त्यांच्यावर आता उपचार करण्यात येणार आहेत.

संजय राऊत यांनी लिलावतीमधील डॉक्टरांची वेळ घेतली होती. डॉक्टर राऊतांवर उपचार करणार असून आगामी 2 दिवस ते लिलावती रूग्णालयात राहणार आहेत. त्यामुळे फायरब्रॅन्ड राऊतांची भुमिका कोण निभावणार हे पहाव लागणार आहे. रूग्णालयाच्या 11 व्या मजल्यावर त्यांना अ‍ॅडमीट करण्यात येणार आहे. 2 दिवस राऊतांना सक्तीचा आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासुन तणावात असल्यानं त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहेत. दरम्यान, लिलावतीच्या डॉक्टरांनी राऊत यांची प्रकृती व्यवस्थित असून काही एक घाबरण्यासारखं नाही असं सांगितलं आहे.