Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

खळबळजनक ! ५० रुपयात १०० आवाजी प्रदूषण मुक्त फटाक्याने नगरकरांना घातली भुरळ


अहमदनगर// शहरातील माळीवाडा वेशी जवळच्या रस्त्यावर शून्य प्रदूषणाच्या फटाक्याने धुमाकूळ घातलाय.जागतिक पातळीवर प्रदूषणाचे प्रमाण वाढत असताना व दिवाळीच्या फटाक्यांच्या माध्यमातून प्रदूषणाची पातळी वाढत असताना हा शून्य प्रदूषणाचा फटाका येत्या कालावधीत प्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी उत्तम पर्याय होऊ शकतो. उदर निर्वाह म्हणून सदर विक्रेता या उपक्रमाकडे पाहत असला तरी  हा कमी खर्चातील आनंदाचा प्रयोग निश्चितच गौरवशाली ठरतो आहे.  प्रत्येक जण या फटाक्यांच्या आवाजाकडे आणि वर उडणाऱ्या पत्र्याच्या डब्याकडे आकर्षित होतो आहे .



फटाक्याची कार्यप्रणाली जाणून घेतो.
विक्रेत्याने दिलेली माहिती अशी की नवसागर, सिमेंट व चुनखडक यापासून तयार केलेले छोटे छोटे दगडाप्रमाणे भासणारे तुकडे आहेत. हा तुकडा एका मोकळ्या डबीत झाकणावर ठेवून त्याला पाण्याचा थेंब लावला जातो. डबीच्या तळाला छिद्र पाडलेले असून डबीचा भाग झाकणावर उलटा ठेवला जातो.  छिद्राजवळ जळणारा कागद धरला असता आतील मिश्रणापासून निघणाऱ्या वायूचा स्फोट होतो व छोटेखानी स्फोटात पत्र्याचा डबा सुमारे 50 फुटापेक्षा जास्त वर उडतो व मोठा फटाका फुटल्याचा आवाज होतो.



      नवसागर, सिमेंट, चुनखडक व पाणी यांची अभिक्रिया होऊन त्यातून ज्वलनशील वायूचे निर्माण होते. तो वायू छिद्राद्वारे बाहेर निघत असताना अग्नीशी संपर्क आल्यानंतर वायू पेट घेऊन स्फोट होतो.मिश्रणातून तयार झालेला एक दगड साधारणता 20 ते 30 ग्रॅमचा आहे. तंबाखू व खैनीच्या रिकाम्या डब्या या प्रयोगासाठी वापरल्या जात आहेत.


      हा खेळ पाहण्यासाठी व असा फटाका विकत घेण्यासाठी आबालवृद्धांनी तोबा गर्दी केली आहे. डबा व खडा यांची मिळून पन्नास रुपये किंमत असून एका दगडामध्ये साधारणत: शंभर बार होतील, असा दावा विक्रेत्याने केला आहे.