Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

१५ मिनिटांत..! ऑनलाईन वेबसाईटच्या कस्टमर केअरकडून बोलत असल्याचे सांगून त्यांच्या खात्यातून ९९ हजार ९९९ रुपये लंपास...


मुंबई // गुगुलवरील कस्टमर केअर आता फसवणुकीचा नवा फंडा ठरु लागला आहे. एका महिलेला मंगळवारी हा अनुभव आला. त्यांनी ऑनलाईन कपड्याची ऑर्डर केली होती. त्या घरी नसल्याने ही डिलिव्हरी परत गेली. म्हणून त्यांनी गुगलवरुन कस्टमर केअरशी संपर्क केला. त्यातून त्या हॅकरच्या जाळ्यात अलगद अडकल्या.

ऑनलाईन कपडे विक्री करणाऱ्या वेबसाईटच्या कस्टमर केअरकडून बोलत असल्याचे सांगून तुमची ऑर्डर परत पाठविण्यासाठी १० रुपये पाठविण्यास सांगून महिलेची एक लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. हॅकरने केवळ १५ मिनिटात बँक खाते रिकामे केले.

याप्रकरणी रहाटणी येथील एका ३१ वर्षाच्या महिलेने वाकड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. या महिलेने शाईन डॉट कॉम या कपडे विक्रीच्या वेबसाईटवरुन एक टॉप निवडून त्याची ऑर्डर केली होती. त्यानुसार कंपनीकडून त्यांना डिलिव्हरी पाठविण्यात आली. मात्र, त्या घरी नसल्याने ती ऑर्डर परत गेली. तेव्हा त्यांनी गुुगलवरुन कंपनीचा कस्टमर केअर नंबर मिळविला व मंगळवारी दुपारी तेथे संपर्क साधला. तेव्हा फोन घेणाऱ्याने आपण शाईन डॉट कॉमच्या कस्टमर केअरवरुन बोलत आहे, असे सांगितले. तुमची एक ऑर्डर शाईन डॉट कॉमवर पेडिंग दिसत आहे. ही ऑर्डर परत पाठविण्यासाठी त्यांना १० रुपये पाठविण्यात सांगितले.

फिर्यादीचे मोबाईलवरुन मेसेज फॉरवर्ड करण्यास सांगितले. त्यानंतर त्याने पाठविलेल्या लिंकवर माहिती भरण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी आपली वैयक्तिक माहिती भरली. त्यानंतर पुढच्या १५ मिनिटांत त्यांच्या खात्यातून ९९ हजार ९९९ रुपयांचे व्यवहार होऊन पैसे काढले गेले.