Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

भाजप आणि शिवसेनेत आणखी तणाव वाढला देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, मुख्यमंत्रिपदाबाबत शिवसेनेला ‘स्पष्ट’ नकार..


मुंबई //अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद देऊ असे कधीच सांगितले नाही. मुख्यमंत्र्यांच्या या विधानानंतर भाजप आणि शिवसेनेत आणखी तणाव वाढला आहे. देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाबाबत कोणताही समझोता होणार नसल्याचं सांगत शिवसेनला स्पष्ट इशारा दिला आहे.  1995 चा फॉर्म्युला येईल असे देखील काही एक होणार नाही. मुख्यमंत्रिपदासाठी प्रस्ताव आला होता मात्र त्याबाबत बातचीत झाली नाही, असं अमित शहांनीही मला सांगितल्याचा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.

अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रिपदाचा शिवसेनेला शब्द दिलेला नव्हता. भाजपाच्या नेतृत्वातच सरकार स्थापन होणार असून वाटाघाटी झाल्या त्यावेळी अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाचा शब्द नव्हता. चर्चेतून तोडगा काढला जाईल, कोणतीही आडमुठी भुमिका घेणार नाही. शिवसेनेच्या मागण्या रास्त असल्यास विचार करता येईल, आम्ही कोणताही पर्याय शोधत नाही आहोत. शिवसेना देखील शोधत नाही. 50-50 काय ठरलं होतं ते आगामी 2-3 दिवसांमध्ये कळेल, असं मोठं आणि सूचक विधान मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

शनिवारी शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक झाली. त्यामध्ये अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रिपद तसेच सत्तेत बरोबरीनं वाटाही घ्या, अशी मागणी आमदारांनी केली होती. आमदारांनी सत्तास्थापनेचे सर्व अधिकार उध्दव ठाकरे यांना दिले होते. आता मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत हे मोठे विधान केल्यामुळे शिवसेना पेचात पडली आहे. आगामी दोन-तीन दिवसांमध्ये राज्यातील सत्तास्थापनेचं चित्र स्पष्ट होईल मात्र सद्यस्थितीत भाजप-शिवसेनेत तणाव निर्माण झाला असं आपल्याला म्हणता येईल.