मुंबई // विधिमंडळ नेतेपदासाठी चंद्रकांत पाटलांनी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचा प्रस्ताव मांडला . या प्रस्तावाला सुधीर मुनगंटीवारांनी अनुमोदन दिलं.
राष्ट्रवादी काँग्रेच्या विधिमंडळ नेतेपदी अजित पवार यांची निवड करण्यात आली आहे. आज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्याविधिमंडळ पक्षाच्या सदस्यांच्या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचेप्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्या नावाची घोषणा केली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने 54 जागांवर विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेसपेक्षा अधिक जागा मिळाल्याने विरोधी पक्षनेतेपदाची संधी राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार आहे.
विधिमंडळ नेतेपदी निवड केल्याबद्दल देवेंद्र फडणवीस व आजित पवार यांनी सर्वांचे आभार मानले.
'माझ्यासारख्या लहानशा कार्यकर्त्याला 2 वेळा जबाबदारी दिल्याबद्दल नरेंद्र मोदींचे विशेष आभार मानतो,' असं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना म्हटलं. त्यांच्याबरोबरच फडणवीस यांनी जे.पी.नड्डा आणि अमित शहांचेसुद्धा आभार मानले.



Social Plugin