Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

एका प्रकरणातील आरोपी आणि फिर्यादी दोघांच्या मृत्यू;याघटनेमुळे एकच खळबळ

केज//  तालुक्यातील विडा येथे राहणारा संतोष दगडू वाघमारे (वय 35) हा ऊसतोड मुकादम होता. त्याचे अनिता सहदेव वायबसे हिच्याशी संबंध होते. विवाहित अनिताचा नवरा दारू पिऊन तिला मारहाण करत असल्यामुळे ती पतीजवळ राहत नव्हती. काही वर्षापासून संतोष व अनिता केज येथे एकत्र राहत होते. मागील 28 ऑगस्ट रोजी या दोघांत कडाक्याचे भांडण झाले.
 अनितास मारहाण करून संतोषने तिला घराबाहेर हाकलून दिले. त्याचा राग मनात धरून अनिता हिने संतोष वर 28 ऑगस्ट रोजी केज पोलीस ठाण्यात मारहाण व 376 चा गुन्हा दाखल केला. दोन दिवसांपूर्वी संतोष जामीनावर सुटला होता. रात्री तो विडा येथून केज कडे येत असताना मस्सजोग जवळ त्याच्या मोटारसायकलला अपघात झाला. त्यात तो जागीच ठार झाला. याच वेळी सकाळी फिर्यादी अनिता हिचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली अपघात झालेले ठिकाण व अनिताचा मृत देह सापडल्याचे ठिकाण अवघे 6 किमी आहे. यात घातपाताची शक्यता असू शकते असा पोलिसाचा अंदाज आहे. पोलीस घटना स्थळी पंचनामा करण्यासाठी गेले आहेत.