Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीकरांसाठी खुशखबर ! खडका येथील पिण्याचे पाणी नळाव्दारे लवकरच मिळणार ...




 परळी //परळी तालुक्यात  अत्यल्प पाऊस झाल्याने वाण धरण अद्यापही कोरडेच आहे, त्यामुळे पिण्याच्या पाण्या बरोबरच सिंचनाचाही प्रश्न गंभीर बनला आहे. शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी सध्या खडका बंधारा उपयोगाचा आहे त्यामुळे तातडीने हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी विरोधीपक्ष  नेते धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली थर्मल पावर स्टेशन चे मुख्य अभियंता (C G M )यांच्या सोबत परळी शहराला पाणी पुरवठा बाबत चर्चा केली असता.खडका बंधार्‍यातुन परळी शहराला पाणीपुरवठा करावा यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना. धनंजय मुंडे यांनी विभागीय आयुक्त यांच्यासह संबंधित अधिकार्‍यांना लेखी पत्र देऊन मागणी केली होती. शनिवार दि 31 ऑगस्ट रोजी मुख्यअभियंता एन.एम.शिंदे यांच्याशी फोनवर बोलुन परळी शहराला तात्काळ पाणी पुरवठा करण्याची मागणी केली आहे. मुख्यअभियंता शिंदे यांनी लवकरच शहराला पाणी पुरवठा करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे. दरम्यान महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते ना. धनंजय मुंडे यांनी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी अरविंद मुंडे यांना तांत्रिक बाबींची पूर्तता करून शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत

परळी शहराला खडका बंधार्यातून पाणी पुरवठा करण्यासंबंधी आदेश द्यावा, अशी याचिका दाखल केली होती. यावर मा. न्यायालयाने या संबंधाचा निर्णय बीडच्या जिल्हाधिकार्यांनी घ्यावा असे आदेश पारीत केले होते. जिल्हाधिकारी खडका बंधार्‍यातील पाण्यासंबंधी कोणतेही आदेश देत नसल्याने चंदुलाल बियाणी यांनी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती. त्यानंतर बीड च्या जिल्हाधिकारी यांनी विज निर्मीती केंद्रास परळी शहराला खडका बंधार्‍यातुन पाणी पुरवठा करण्याचे लेखी आदेश दिले होते.   दरम्यान, नगर परिषदेने यासंबंधी विज निर्मिती केंद्राकडे खडका बंधार्यातून परळी शहराला पाणी पुरवठा करावा या संबंधी कागदोपत्री पाठपुरावा केला होता. तसेच पाण्याच्या मोबदल्यात विज निर्मीती केंद्रास नगर परिषद पैसे देण्याचे लेखी पत्र दिलेले आहेत.  2 महिन्यांपुर्वी विज निर्मिती केंद्राच्या मुख्य अभियंत्याने खडका बंधार्यात जायकवाडी धरणातून जो पर्यंत पाणी येत नाही तो पर्यंत शहराला पाणी पुरवठा करता येणार नसल्याचे लेखी पत्र दिले होते. खडका बंधारा 15 दिवसांपुर्वी पुर्ण क्षमतेने भरलेला आहे. परंतू विज निर्मिती केंद्राच्या अधिकार्यांनी लेखी पत्र देऊनही परळी शहराला पाणी पुरवठा केला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष चंदुलाल बियाणी, माजी नगराध्यक्ष दिपक देशमुख, नगरसेवक अन्वर मिस्कीन, सामाजिक कार्यकर्ते नूर खान यांनी 31 ऑगस्ट रोजी खडका बंधार्याची पाहणी केली यावेळी बंधारा पुर्ण क्षमतेने भरलेला दिसून आला. त्यानंतर बियाणी यांच्यासह सर्व जण विज निर्मिती केंद्राचे मुख्य अभियंता शिंदे यांची भेट घेऊन परळी शहराला पाणी पुरवठा करण्यासंदर्भात जाब विचारला असता त्यांनी तात्काळ शहराला पाणी पुरवठा करण्यास परवानगी दिली. 
विज निर्मिती केंद्रातील व नगर परिषदेतील अधिकारी व कर्मचारी यांनी याबाबत तांत्रिक बाबी पुर्ण करुन परळी शहराला पाणी पुरवठा करण्यासंबंधी हालचाली सुरु केल्या आहेत. खडका बंधार्‍यातुन परळी शहराला पाणीपुरवठा करावा या मागणीसाठी माजी नगराध्यक्ष दिपक देशमुख यांनी उपविभागीय कार्यालया समोर दोन दिवस उपोषण करूण मागणी लाऊन धरली होती. 
 त्यांनी खडका डॅमचे पाणी परळी साठी मिळणार असून  उद्याच काम चालु करण्याचे आदेश दिले आहेत. सोबत माजी नगराध्यक्ष दिपक नाना देशमुख, नगरसेवक चंदूलाल बियाणी व अनवरभाई मिस्कीन यांनी चर्चा केली .