मिञांनो...
महाराष्ट्रातील राजकीय मंडळीने बिनपगारी सेवकाच्या पत्नीला गळ्यातील मंगळसूत्र विकायची वेळ आणली आहे .
राजकीय नेत्यांनी व शिक्षणसम्राटांनी शाळेतील अनेक सेवकांचे शोषण केले. अनेक सेवकांनी तुटपुंज्या सरकारी पगारापायी जमिनी विकल्या .ज्या महाराष्ट्रात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पत्नीने गळ्यातले मंगळसूत्र मुलांसाठी गहाण ठेवले त्याच महाराष्ट्रातील राजकीय मंडळीने बिनपगारी सेवकाच्या पत्नीला गळ्यातील मंगळसूत्र विकायची वेळ आणली आहे .
पुन्हा अशा संस्थातून सेवक झालेल्यांना नोकरीसाठीही पैसे मोजावे लागले. खाजगी शिक्षणसंस्थांनी जातवार राजकीय सोयीनुसार सेवकभरती केली. तीभरती करताना त्यांनी हायस्कूल व महाविद्यालयात सेवक भरताना लाखो रुपये घेतले.
तेव्हा नोकरीला डोनेशन आणि आता नोकरीसाठी ही पैसे. पुन्हा शासकीय मान्यतेसाठीही पुन्हा लाच लाखो रुपये मोजवी लागतात. अशा आर्थिक नाडलेल्या सेवक तरुण तरुणीत ध्येयवाद उरला नाही.
सेवक म्हणून लागलेले सुशिक्षित तरुण हे अति व्यावहारिक झाले. त्यांना ध्येयवाद वगैरे शब्द हे चेष्टेचे विषय वाटायला लागले. ते थट्टा करू लागले. या आर्थिक ध्येयशून्य लाचखोरीच्या पुरात हे सारे वाहून गेले आणि फक्त उरले...नियम अटी.
राजकीय नेत्यांना शाळातील सेवकाविषयी अजिबात आदर नाही . त्यांनी सेवकांना कायम वस्तु म्हणून गाढव संबोधले व वापरले.
त्यात पुन्हा शासनाची धोरणे ही सेवकाला मारणारीच आहेत . सकाळी त्या त्या वेळेप्रमाणे घंटा वाजविणे , दुसरी घंटा वाजली की तो ...तो यांत्रिक होतो.
त्यांनी हे अन्याय झेलताना कसे आदर्श झेलावेत पुन्हा छोट्या छोट्या कामासाठी अधिकारी सतत ताणे मारतात त्यातून सेवकातील आदर्शवाद मरत गेला. शशशशशा
कारण हे आहे की सेवकाचे काम मोजण्याची कोणतीच प्रक्रिया नाही त्यामुळे ‘सब घोडे बारा टक्के’ अशी स्थिती झाली आहे. चांगल्याचे कौतुक नाही आणि वाईटाला शिक्षा नाही अशी अवस्था आहे. त्यामुळे चांगले काम करणारा सेवकही हळूहळू इतरांसारखा होत जातो आहे .

Social Plugin