बीड // घरात अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत स्वतःचे जीवन जगत असताना सुद्धा या महिलांनी या अगोदरच 20 बालकांना जन्म दिला असून आता ती 21 व्यादां बाळत होत आहे .. बीडच्या माजलगावपासून दोन किलोमीटर अंतरावर केसापुरी वसाहतीत राहणारी ही महिला तब्बल एकविसाव्यांदा बाळाला जन्म देणार आहे. लंकाबाई खरात असं या महिलेचं नाव आहे. आरोग्य विभागाला माहिती मिळताच कर्मचारी चक्रावून गेले आणि त्या महिलेची रवानगी सरकारी रुग्णालयात केली आहे.
केसापुरी वसाहतीत मालोजी देविदास खरात हे पाल ठोकून राहतात. त्यांची पत्नी लंकाबाई सध्या 21व्या वेळी आठ महिन्यांची गरोदर आहे. लंकाबाई यांना आधीच नऊ मुली आणि दोन मुले अशी 11 अपत्ये आहेत. तर नऊ अपत्ये बाळंतपणानंतर दगावली. आता बाळंतपणाची त्यांची एकविसावी वेळ आहे. विशेष म्हणजे लंकाबाई यांची याआधीची 20 बाळंतपणं घरीच झाली आहे, मात्र एकविसावी प्रसुती पहिल्यांदाच रुग्णालयात होणार आहे.
अशीच घटना लातूरमध्ये आहे .आजही महिलांची 10-12 बाळंपतपणं
लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यातल्या अन्सर वाडीत आजही महिलांची दहा ते बारा बाळंतपणं सहज होतात. या गावात गावोगावी भिक्षा मागून जीवन जगणारा गोपाळ समाज राहतो. या गोपाळ समाजामध्ये अशा असंख्य महिला आहेत की त्यांना किमान पंधरा ते वीस मुलं आहेत आणि ती हयात सुद्धा आहेत. एवढ्या मुलांची नावं काय ठेवायची म्हणून या मंडळींनी मुलांची नावं भाजी, भाकरी, गांजा, दारु, गोळी, बंदूक, सुपारी अशी ठेवली आहे.
Social Plugin