अंबाजोगाई // आज दि.९ सप्टेंबर 2019 एकदिवसीय शाळा बंद आंदोलन सुरू आहे. या अनुषंगाने अंबाजोगाई येथीलआंदोलनकर्ते शिक्षकांनी तहसील , उपजिल्हाधिकारी येथे मागणीचे निवेदन दिले.सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जाहीर केलेली नवी पेन्शन योजना जाचक असल्याचा दावा करत लवकरात लवकर जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी सर्वांनी सहभाग नोंदावला.
सरकारी कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबांना १० लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या नव्या पेन्शन योजनेला सरकारी कर्मचाऱ्यांनी विरोध केला. जुनी पेन्शन योजना लागू असलेल्या सरकारी कर्मचाऱ्याचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास, त्याच्या पत्नीला मिळणारे निवृत्तीवेतन, विकलांग मुलगा वा मुलीस मिळणारे कुटुंब निवृत्तीवेतन, ग्रॅच्युईटी सात लाखांच्या मर्यादेत तसेच भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा असलेली संपूर्ण रक्कम नव्या पेन्शन योजनेतील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला द्यावी. जुन्या योजनेप्रमाणेच नव्या पेन्शन योजनेतही सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कोणतीही रक्कम कापू नये, पेन्शनची तरतूद सरकारने करावी, अशा मागण्या संघटनेने केल्या आहेत.या मागण्यांबाबत राज्यभरातील शिक्षक संघटनांच्या वतीने एकदिवसाचा शैक्षणिक संप पुकारण्यात आला होता. यावेळी अंबाजोगाई येथील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .
Social Plugin