Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

Breaking !अखेर जायकवाडी धरण भरले ; कोणत्याही क्षणी दरवाजे उघडण्याची शक्यता.....!! नियोजनपुर्वक सोडणार पाणी ..





नांदेड// जिल्ह्यातील विष्णुपूरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस न पडल्यामुळे विष्णुपूरीच्या जलसाठ्याची परिस्थिती गंभीरच होती. जायकवाडी धरणात सध्यास्थितीत 84 टक्क्यांच्यावर पाणीसाठा झाला असल्याने कोणत्याही क्षणी या धरणाचे दरवाजे उघडण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्तांकडे जिल्हाधिकारी कार्यालयाला संदेश पाठवून सांगण्यात आला. गोदाकाठीच्या सर्व गावकऱ्यांना या संदर्भाने अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

विभागीय आयुक्तांनी रविवारी दुपारी दूरध्वनीवरून नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिली आहे की, जायकवाडी प्रकल्पातील पाणीसाठा हा आता 84 टक्क्यांपर्यंत पोहचला आहे. या धरणातून सध्यास्थितीत वीजनिर्मितीसाठी पाणी सोडण्यात आले आहे. जायकवाडीत पाण्याचा आवक चालूच असल्यामुळे गोदावरी पात्रात जायकवाडी धरणातून कोणत्याही क्षणी पाणी सोडण्यात येणार असल्याचा सतर्क इशारा नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयास दिला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी नांदेड यांनी  आपत्ती व्यवस्थापन विभागाच्यावतीने जिल्हा पोलिस अधीक्षक, महानगरपालिका आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, पाटंबधारे विभागाचे अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व पोलिस उपअधीक्षक, सर्व तहसीलदार, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व गटविकास अधिकारी यांच्यसह सर्व संबंधीतांना संदेश जारी करून दक्षतेचे आदेश दिले आहेत.जायकवाडी प्रकल्पातील पाणीसाठी 84 टक्के झाला आहे. त्यामुळे त्या पाण्याचा विसर्ग वीज निर्मितसाठी सोडण्यात आला आहे. तसेच माजलगाव कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे.जल्हाधिकाऱ्यांनी गोदावरी नदीकाठावरील सर्व गावांमध्ये अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. गोदावरी नदीवर असलेल्या जलमार्गात असणाऱ्या धरणांचे दरवाजे आवश्यकतेनुसार संचलीत करण्यात यावेत असे आदेशात म्हटले आहे. स्थानिक प्रशासनाने सतर्क राहून कोणताही अनुचित प्रकार होणार नाही याची दक्षता घेण्यास सांगितले आहे. वेळोवेळी कुठल्याही प्रकारची गरज पडल्यास जिल्हाधिकारी प्रशासनाच्या वरिष्ठ कार्यालयांना तो प्रसंग कळविण्याची सुचना केली आहे. जिल्हा पूर नियंत्रण कक्ष, सिंचन भवन नांदेड येथे 24 तास कार्यरत राहणार आहेत. त्याठिकाणचा दूरध्वनी क्रमांक 02462 263870 असा आहे. सोबतच पोलिस नियंत्रण कक्ष नांदेडचा दूरध्वनी क्रमांक 02462 234720 असा आहे. मनपा नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक 02462 262626 असा आहे. जिल्हा नियंत्रण कक्षचा दूरध्वनी क्र. 02462 235077 आणि फॅक्स क्रमांक 02462 238500 असा आहे. कोणत्याही आपत्तीमध्ये या क्रमांकावर संपर्क साधून मदत मागता येईल असे म्हटले आहे.