Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

मुक्त वातावरणासाठी क्लीन इंडिया तर पर्यावरण समतोलासाठी ग्रीन इंडिया - प्रा डॉ . माधव रोडे



परळी // स्वच्छ भारत अभियान एक सार्वजनिक चळवळ " या विषयावर वैद्यनाथ कॉलेजचे रा से यो. चे  प्रा डॉ . माधव रोडे यांच्या व्याख्यान नुकतेच संपन्न झाले .न्यु . हायस्कुल कनिष्ठ महाविद्यालय, व स्वामी विवेकानंद कॉलेज, राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित स्वच्छ भारत पंधरवाडा, एक भाग म्हणून

त्यावेळी त्यांनी सविस्तर मार्गदर्शनतून स्वच्छतेला श्रमदानाची जोड त्यातून सर्वाजनिक स्वच्छता करण्याचा मंत्र जपण्याचे आव्हान केले . आपल्या व्याख्यानात  प्रा . डॉ . माधव रोडे म्हणाले,  स्वच्छतेतूनच सौंदर्य विकासाला, फुलायला प्रारंभ होत असतो,
भारताला समृध्द करणे याचा अर्थ स्वच्छ भारत अभियानातून आपला परिसर स्वच्छ, निर्मळ ठेऊन सौंदर्य दृष्टीकोन वाढीस लागावा . त्यासाठी भारतीय   युवकांनी स्वःच्छाग्रही व्हावे .
क्लीन इंडिया, ग्रीन इंडिया मंत्र जपून प्रदुषण मुक्त वातावरणासाठी क्लीन इंडिया तर पर्यावरण समतोलासाठी ग्रीन इंडिया उपक्रम राबवऊन आपली शाळा, महाविद्यालय, आपला परिसर, गाव , शहर स्वच्छ सुंदर करून राष्ट्र समृध्द करावे . सार्वजनिक स्वच्छता उपक्रम तून सर्वजनाचे आयुष्यमान वाढवण्याचे जनकल्याणाच कार्य आपण करत असतो .
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष  न्यु . हायस्कुल कनिष्ठ महाविद्यालयचे प्राचार्य एम . टी. देशमुख,
उपप्राचार्य प्रा . सुनिल लोमटे , प्रा . डॉ . सुनिल चव्हाण,
स्वामी विवेकानंद कॉलेज उपप्राचार्य प्रा . बी . ए . कदम,
अदि उपस्थिती होते . कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा . डॉ . सुनिल चव्हाण, तर अध्यक्ष समारोप उपप्राचार्य प्रा . सुनिल लोमटे यांनी केला . कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा . अंकुश वाघमारे, तर आभार प्रा श्रीहरि गुट्टे यांनी केले.