Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत योगेश्वरी नूतन विद्यालयाच्या संघाने मिळवले प्रथमपारितोषिक




अंबाजोगाई // महाराष्ट्र राज्य युवा व क्रीडा संचालनाच्यावतीने आयोजित तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत योगेश्वरी नूतन विद्यालयाच्या संघाला प्रथम पारितोषिक मिळाले .
या क्रिकेट संघात आशुतोष धायगुडे , संतोष राठोड , ओमकार भगत , ओमकार जोगदंड, सुमित काटे , आदित्य धायगुडे , कृष्णा मोरे , पियुश पटेकर , अभय चामनर,वदांत सातपुते , ऋषीकेश नेहरकर , रोहन माळी , वैभव शिंदे , प्रभात तोडकर , ओमकार सुरवसे , सूर्यप्रकाश सिरसाट यांचा समावेश होता .
खेळाडूंना मार्गदर्शन क्रीडा विभागप्रमुख एस.के. निर्मळे , धम्मा वैद्य, कुशाल परदेशी यांनी केले .विजयी खेळाडूंचे अभिनंदन संस्थेचे पदाधिकारी डॉ. सुरेश खुरसाले, अॅड . शिवाजीराव कराड , कमलाकर चौसाळकर , गणपत व्यास ,प्रा. माणिकराव लोमटे , प्रा .गोळेगावकर , एस .के. जोगदंड , एस.के. बेलुर्गीकर, मुख्याध्यापिका के.टी. व्यास यांनी केले .