रूमित केमिकल्स कंपनीत नेमक्या कोणत्या कारणामुळं स्फोट झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अग्नीशमन दलाचे जवान, पोलिस अधिकारी व कर्मचारी आणि स्थानिक नागरिक कंपनीला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न करीत आहेत. अग्नीशमन दलाचे बंब घटनास्थळी सकाळीच दाखल झाले आहेत. मयतांचा आकडा वाढला असून तो 12 वर जाऊन पोहचला आहे. मयतांच्या संख्येमध्ये आणखी वाढ होण्याची दाट शक्यता आहे. शिरपूरजवळ वाघाडी ही केमिकलची फॅक्टरी आहे. सकाळच्या सुमारास कंपनीत स्फोट झाला. स्फोटाचा आवाज एवढा मोठा होता की आजुबाजुच्या परिसराला देखील त्याचा हादरा बसला.
Social Plugin